सध्या अनेक बँकानी मुदत ठेवीवर व्याजदर वाढीचा (Interest rate) सपाटा लावला असला तरी त्याचा फायदा लाखो अथवा कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या श्रीमंत गुंतवणुकदारांपर्यत सीमित आहे. परंतु आता एका बँकेने या पायंड्याला मोडता घातला आहे. नियमित मुदत ठेवीवरील व्याजदरात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने (Ujjivan Small Finance Bank) ज्यादा दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बॅंक आपल्या नियमित एफडीवर 7 टक्के व्याज देत आहे. बँकेने 19 मे रोजी एफडी दरात वाढ केली आहे. सर्वसामान्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या एफडीवर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने 75 बेसिस पॉइंट्सची घसघशीत वाढ केली आहे. परिणामी मुदत ठेवीवर आता 6.75 % परतावा मिळणार आहे . रेपो दरात (Repo Rate) वाढ झाल्याने या बँकेने नियमित एफडीच्या दरात वाढ केली आहे. 15 महिने 1 दिवस ते 18 महिन्यांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 6.75 टक्के व्याज दिले जात आहे. 990 दिवसांच्या एफडीवर बँक 7.1 टक्के व्याज देत आहे. त्यात 35 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना नियमित एफडीपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक व्याज दिले जात आहेत. विशेष म्हणजे हा दर सर्व कालावधीच्या एफडीला लागू आहे.
– 15 महीने – 1. 6%. 6.75%
– 24 महीने – 6.60%. 6.90%
– 990 दिवस – 6.75%. 7.10%
तक्त्यावरून स्पष्ट होते, की जर एखाद्या व्यक्तीने एफडीमध्ये 990 दिवसांसाठी 1,00,000 रुपये जमा केले तर त्याला मॅच्युरिटीच्या वेळी 7.1 टक्के दराने 1,21,011 रुपये मिळतील. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना मासिक, तिमाही आणि कालावधी पूर्ण झाल्यावर व्याज देते. ग्राहकाने निवडलेल्या पर्यायानुसार व्याज दिले जाईल. वर नमूद केलेले व्याजदर 5 वर्षांच्या कर बचत करणाऱ्या एफडीसाठीही लागू आहेत. पण ही एफडी 5 वर्षांपूर्वी मोडता येणार नाही.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेनेही प्लॅटिना मुदत ठेवींच्या दरात वाढ केली असून तो 7.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर 990 दिवसांच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आला आहे. आधीच 35 बेसिस पॉइंट वाढवण्यात आले आहेत. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने प्लॅटिनम मुदत ठेवीत पैसे जमा केल्यास त्याला वार्षिक 7.95 टक्के व्याज मिळेल. त्यासाठी 990 दिवसांच्या निश्चित कालावधीसाठी रक्कम गुंतवावी लागले.
या योजनेअंतर्गत ग्राहक किमान 15 लाख ते 2 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करू शकतात. प्लॅटिना एफडी नॉन-कॉबलेबल आहे, म्हणजे आंशिक आणि अकाली पैसे काढण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध नाही. प्लॅटिना एफडीमध्ये 990 दिवसांसाठी 7.95% दराने 20,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना कालावधी पूर्ण झाल्यावर 24,75,572 रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकतो.
रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरात वाढ केली, त्यानंतर मुदत ठेव दरात वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढल्याने गृहकर्ज, चारचाकी वाहन कर्ज आदी किरकोळ कर्जे महाग होत आहेत, तर एफडीचे दर ही वाढत आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनेचे दर वाढवले असून हा ट्रेंड अव्याहतपणे सुरू आहे.