नवी दिल्लीः रशिया-यूक्रेन मधील तणाव (Ukraine Russia Crisis) दिवसागणिक वाढतच आहे. दोन्ही राष्ट्रांमधील वादाची झळ जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांना थेट फटका बसत आहे. कच्च्या तेलाच्या भावाने विक्रमी टप्पा गाठला आहे. सोने-चांदीच्या भावात मोठी तेजी नोंदविली गेली. रशियाने युक्रेनविरोधातील आघाडीमुळे शेअर बाजार गडगडला आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील वादामुळे मद्यप्रेमींची (Wine industry) गोची होण्याची शक्यता आहे. मद्यनिर्मितीसाठी पूरक असलेल्या खाद्यान्याच्या किंमती तुटवड्यामुळे वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थेट फटका वाईन व बिअरच्या किंमतीवर होणार असल्याचं निरीक्षण ब्रोकिंग फर्म मोतीलाल ओसवाल यांनी नोंदविलं आहे. इतकंच नव्हे तर बिअर कंपन्यांचा (beer companies) नफाही यामुळे घटू शकतो.
बिअर निर्मितीत सातूचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. गेल्या काही दिवसांपासून सातूच्या किंमती वेगाने वाढक आहे. गेल्या एका वर्षात सातूच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. गेल्या तिमाहीत 3 टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत. रशिया सातू किंवा बार्ली उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर यूक्रेन चौथ्या क्रमांकावर आहे. मद्यनिर्मितीत महत्वाचा घटक असलेल्या बार्ली (सातू)च्या पुरवठ्यावर दोन्ही देशांतील तणावाचा थेट फटका बसू शकतो. त्यामुळे मद्याच्या किंमती वाढू शकतात.
मोतीलाल ओसवाल रिपोर्टमध्ये भारतातील मद्य उद्योगाला फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बिअर निर्मितीसाठी सातूच्या पुरवठ्यात घट झाल्यास उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. मोतीलाल ओसवालच्या रिपोर्टनुसार, United Breweries सारख्या कंपन्यांचा नफ्यात घट होऊ शकते. उन्हाळ्याच्या हंगामात बिअरला सर्वाधिक मागणी असते. सध्या बिअर कंपन्या उन्हाळ्यी हंगामाच्या तयारीत गुंतल्या आहेत. रशिया-युक्रेन वादानं तोंड काढल्यामुळं मद्यप्रेमींच्या तोंडाचं पाणी पळण्याची शक्यता आहे.
Paratroopers landing operations of the Russian army in the vicinity of the town of Ryumari ???#Kyiv #RussiaUkraineConflict pic.twitter.com/pqHaC2aesa
— Dow Jones (@top__999) February 24, 2022
गव्हाची आयात निर्यात करताना काही व्यत्यय आल्यास गव्हाची किंमत आणि इंधनाचा दर वाढू शकतो,अशी भीती तज्ञ मंडळांनी व्यक्त केली आहे. रशिया हा देश जगातील सर्वात मोठा गहू निर्यात करणारा देश आहे व त्यानंतर युक्रेन हा देश जगातील चौथ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. गव्हाच्या एकूण जागतिक निर्याती पैकी एकंदरीत एक चतुर्थाश वाटा या दोन्ही देशांचा आहे.
संबंधित बातम्या