वेलकम इंडिया: विदेशी पर्यटकांना रेड कार्पेट, टूरिझम पॅकेज टॅक्सला कात्री

| Updated on: Apr 01, 2022 | 9:45 PM

कोविड प्रकोपामुळं अन्य क्षेत्रांसोबत पर्यटन क्षेत्राला (TOURIST INDUSTRY) मोठा फटका बसला होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे पर्यटन उद्योगाला पुन्हा बहर येण्याची शक्यता आहे.

वेलकम इंडिया: विदेशी पर्यटकांना रेड कार्पेट, टूरिझम पॅकेज टॅक्सला कात्री
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: File Photo
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशांतर्गत सहल आयोजक (Tour Company ) कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. भारतभ्रमणासाठी येणाऱ्या अनिवासी भारतीय यात्रेकरुंना भारतात पॅकेज बुकिंग वरील करात सवलत दिली आहे. देशांतर्गत सहल आयोजकांना विदेशी नागरिकांच्या टूर पॅकेज बुकिंगवर 5 टक्के टीसीएस  (Tax Collected at store ) कर अदा करावा लागत होता. कोविड प्रकोपामुळं अन्य क्षेत्रांसोबत पर्यटन क्षेत्राला (Tourism Industry) मोठा फटका बसला होता. दरम्यान, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे पर्यटन उद्योगाला पुन्हा बहर येण्याची शक्यता आहे. भारतात जगभरातून पर्यटकांचा ओघ असतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून स्वस्त आणि सुलभ पर्यटनासाठी कराला कात्री लावण्याची मागणी करण्यात येत होती. नव्या नियमामुळे भारतातील सहलींच्या पॅकेजच्या किंमती मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून गंगाजळीत निश्चितच भर पडण्याची आशा पर्यटक व्यावसायिकांना आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार, विदेशी पर्यंटकांना भारतातील पर्यटनासाठी विशिष्ट स्वरुपाचा कर अदा करावा लागतो. सर्वाधिक खर्च करणाऱ्या व्यक्तींवर मर्यादा म्हणून टीसीएसची आकारणी केली जाते.

निर्णयाचा नेमका परिणाम?

आयकर विभागाचा नवा नियमामुळे पर्यटन उद्योगाला फायदा होण्याची शक्यता आहे. करकपातीमुळे कोणत्याही अतिरिक्त रकमेशिवाय पॅकेजची खरेदी करण सहज शक्य होईल. पर्यटन उद्योगावर लाखो व्यक्तींना रोजगाराचे साधन मिळते. कोविडमुळे विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली होती. नव्या निर्णयामुळं विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल अशी आशा पर्यटक व्यावसायिकांना आहे.

पधारो भारत:

बहुतेक देशांतील नागरिकांचा वैध पासपोर्ट असला पाहिजे व त्यांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक भारतीय दूतावासत प्रवासी व्हिसासाठी अर्ज करावा असा सर्वसाधारण नियम आहे. प्रवासी थेट टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः किंवा त्यांच्या स्थानिक प्रवासी सेवा कंपनीद्वारे अर्ज करू शकतात. ई-टूरिस्ट व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी भारताने अलीकडेच १६८ देशांच्या नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धत लागू केली आहे.

‘या’देशांना नो व्हिसा:

भूतान, मालदीव आणि नेपाळ च्या नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी प्रवासी व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. अफगाणिस्तान, अर्जेन्टिना, बांगलादेश, उत्तर कोरिया, जमैका, मालदीव, मॉरिशस, मंगोलिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि उरुग्वे येथील नागरिकांना भारतीय व्हिसा मिळविताना शुल्क भरणे आवश्यक नाही.

इतर बातम्या :

…गृह कर्ज घेतायं?, प्रक्रिया ते फोरक्लोजर शुल्क, जाणून घ्या-सर्व एकाच क्लिकमध्ये

GudhiPadwa | गुढी उत्साहाची, निर्बंधमुक्तीची… राज्यात सोने खरेदीचा उत्साह, वाचा Gold Price Today!