नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : एटीएमवर रोख रक्कम काढायला गेलात आणि डेबिट कार्ड घरी विसरलात तरी हरकत नाही. लवकरच तुम्ही विना ATM Card रोख रक्कम काढू शकता. देशात व्हाईट-लेबल युपीआय एटीएमची अगोदरच सुरुवात झाली आहे. या सुविधेमुळे कार्डलेस कॅश विड्रॉल म्हणजे विना कार्ड पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. युपीआय एटीएमच्या (UPI ATM)
मदतीने रक्कम काढता येईल. अर्थात यामुळे एटीएमवर डेबिट कार्डच्या (Debit Card Fraud) माध्यमातून फसवणूक होणार नाही. युपीआय पेमेंटच्या सहायाने रक्कम काढता येईल. राष्ट्रीय देयके महामंडलाच्या (NPCI) सहकार्याने ही योजना देशभर राबविण्यात येत आहे.
कशी काढाल रक्कम
तुम्हाला रोख रक्कमेची गरज आहे आणि एटीएममधून पैसे काढायचे असतील तर आता मोबाईल मदतीला धावेल. एटीएम मशीनवर एक क्युआर कोड असेल. तुमच्या मोबाईलमधील युपीआय पेमेंट एपच्या मदतीने रोख रक्कम काढता येईल. त्यासाठी एटीएमवरील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. QR Code स्कॅन करताच कार्डलेस कॅश एटीएममधून बाहेर येईल.
कार्ड स्किमिंगचा धोका नाही
कार्डलेस कॅश विड्रॉलमुळे कार्ड स्किमिंगचा धोका कमी होईल. डेबिट कार्ड एटीएममध्ये टाकल्यावर सायबर भामटे कार्ड क्रमांक आणि पिन चोरतात आणि खात्यातील रक्कमेवर हात साफ करतात. यामध्ये डेबिट वा क्रेडिट कार्डचा प्रत्यक्ष वापर होणार नाही. त्यामुळे कार्ड स्किमिंगसारखी फसवणूक होणार नाही.
फॉलो करा या स्टेप्स पाच
किती काढता येईल रक्कम
युपीआयच्या माध्यमातून एटीएममधून एकावेली केवळ 10 हजार रुपये काढता येतील. युपीआय पेमेंटमुळे वापरकर्त्याला विविध बँकेचे एटीएम कार्ड ठेवण्याची गरज उरली नाही. एकूणच या सुविधा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कोणताही एक स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तरच युपीआय पेमेंट होऊ शकेल.