Ticket Booking Rule: भारतीय रेल्वेतून लाखो लोक नियमित प्रवास करतात. सर्वांचे प्राधान्य आरक्षण तिकीट करुन प्रवास करण्याचे असते. परंतु अनेकदा तिकीट कन्फर्म होत नाही. त्यावेळी ऑनलाईन तिकीट असेल तर त्याचे पैसे खात्यात परत येतात. परंतु तिकीट जर रेल्वेच्या काऊंटरवरुन काढले असेल तर त्याच ठिकाणी जाऊन रद्द करावे लागते. त्यावेळी काही पैसेही कापले जातात. परंतु तुम्हाला म्हटले रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाही तर दुप्पट पैसे मिळतील? तर खरे वाटणार नाही. परंतु एक अशी ट्रिक आहे, तिचा वापर केल्यावर तिकीट कन्फर्म मिळणार आहे. तिकीट कन्फर्म न झाल्यास तुम्हाला दुप्पट पैसे परत मिळतील.
ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला गोआयबीबी वेबसाईट किंवा अॅपचा वापर करावा लागतो. त्या अॅप किंवा वेबसाईटवरुन वेटींग तिकीट बुक करताना ‘गोकन्फर्म्ड ट्रिप’ तिकिटाचा पर्याय निवडावा लागणार आहे. त्यानंतर तिकीट कन्फर्म होण्याच्या संधी वाढणार आहे. चार्ट तयार झाल्यानंतर वेटींग तिकीट कन्फर्म झाले नाही तर तुम्हाला दुप्पट पैसे परत मिळणार आहे. कंपनीकडून ही दुप्पट पैसे तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे तिकीट बुक करताना डेबिट झालेल्या खात्यावर तिकिटाचे भाडे आयआरसीटीसीकडून परत केले जाईल. उर्वरित रक्कम ‘ट्रॅव्हल व्हाउचर’च्या स्वरूपात परत केली जाईल. हे ट्रॅव्हल व्हाउचर प्रवासी Goibibo प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली इतर कोणतीही वाहतूक जसे विमान, बस, ट्रेन किंवा कॅब बुक करण्यासाठी वापरू शकतात.
कंपनीने म्हटले आहे की, तुम्ही डबल रिफंडसाठी पात्र तेव्हाच ठरणार जेव्हा चार्ट लागल्यानंतर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही. जर चार्ट तयार करताना तुमचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी झाले तर दुप्पट पैसे मिळणार नाही. ही ऑफर फक्त वेटींग तिकिटांसाठी आहे. तसेच गोआयबीबो प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक केल्यावर निवड श्रेणीसाठीच लागू आहे. जास्तीत जास्त 3,000 रुपये परत मिळणार आहे. बल्क बुकींग करताना काही तिकीट कन्फर्म झाले तर दुप्पट रिफंड मिळणार नाही.