तुम्हालाही पॅनकार्डवरील फोटो बदलायचा आहे, अगदी सोप्या पध्दतीने सहज शक्य आहे…

| Updated on: Feb 06, 2022 | 9:14 AM

अगदी मिनीटात आपण घरबसल्या पॅनकार्डवरील आपला अस्पष्ट फोटो सहज व सोप्या पध्दतीने बदलू शकतो. यासाठी आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पध्दती सांगणार आहोत, ज्यामाध्यमातून कुठेही बाहेर न जाता तुम्ही हे काम करु शकतात.

तुम्हालाही पॅनकार्डवरील फोटो बदलायचा आहे, अगदी सोप्या पध्दतीने सहज शक्य आहे...
पॅनकार्ड
Follow us on

पॅनकार्ड (PAN card) हे आपली ओळख सांगणारे केंद्र सरकारकडून दिले जाणारे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र आहे. अगदी कुठल्याही व्यवहारासाठी (Transaction) आपल्याला पहिल्यांदा पॅनकार्डची मागणी केली जात असते. अनेक वेळा पॅनकार्ड काढत असताना अस्पष्ट फोटो दिला जात असतो. त्यामुळे तो प्रत्यक्षात पॅनकार्डवर उमटताना काळा किंवा अस्पष्ट उमटत असतो. यामुळे नंतर खराब फोटोमुळे (Blur photo) आपणास अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत असतो.

अनेकदा कागदपत्र म्हणून ते नाकारले जात असते. आधार कार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड यासह अशी अनेक कागदपत्रे आहेत, ज्याशिवाय कुठलेही शासकीय किंवा खासगी काम होत नाही. आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वेळा पॅनकार्डमध्ये तुमचा फोटो खूप अस्पष्ट असतो, अशा परिस्थितीत तो बदलणे आवश्यक आहे. अस्पष्ट फोटो बदलण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सहज पूर्ण करू शकता.

पॅनकार्डवरील फोटा असा बदला

1) फोटो बदलण्यासाठी सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

2) त्यावर Apply Online and Registered User चा पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला Application Type च्या पर्यायावर जाऊन PAN मध्ये बदलची निवड करावी.

3) यानंतर करेक्शन आणि चेंजेसचा पर्याय निवडावा. तिथे विचारलेली सर्व माहिती भरावी.

4) ग्राहकाला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि ते करताना सर्व माहिती देखील सबमिट करावी लागेल. यानंतर तुम्हाला KYC चा पर्याय निवडावा लागेल.

5) आता तुम्हाला स्क्रीनवर दोन पर्याय दिसतील, सिग्नेचर मिसमॅच आणि फोटो मिसमॅच. तुम्हाला दोन्हीमध्ये बदल करायचा आहे तो पर्याय निवडा. विनंती केलेली सर्व माहिती भरून पुढे जाण्यासाठी क्लिक करा.

6) यानंतर मागितलेला आवश्यक आयडी पुरावा सबमिट करावा आणि डिक्लेरेशनचा पर्याय निवडून पुढे जावे.

7) ऑनलाइन फोटो बदलण्यासाठी काही शुल्क लागेल, फी भरल्यानंतर तुमचा फोटो बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

8) आता शेवटी तुम्हाला 15 क्रमांकांची पावती क्रमांक मिळेल. यानंतर तुम्ही फोटो बदलण्यासाठी भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता. आणि आयकर पॅन सेवेच्या युनिटला पाठवा, असे केल्याने पॅनकार्डमधील फोटो बदलला जाईल.

संबंधित बातम्या : 

पॅकेजिंग क्षेत्रातील ‘या’ कंपनीने वर्षभरात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांकडून शेअर खरेदीचा सल्ला

‘फास्टॅग’ चे स्टीकर उरले फक्त शोभोचे ! अवघ्या वर्षभरातच फास्टॅगला घरघर ! टोल नाक्यांवरील ना गर्दी हटली ना वाहनधारकांचा त्रास कमी झाला नाही

काय आहे NFT? कशामुळे वाढली सरकारची डोकेदुखी? अवैध कमाईसाठी खरंच होतोय का एनएफटीचा वापर?