प्रवासापूर्वीच हरवलं रेल्वेचं तिकीट, राहा टेन्शन फ्री; वाचा- नेमकं काय करावं?

| Updated on: Jan 14, 2022 | 12:15 AM

ई-तिकीट हे आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवरुन बुक केले जाते. बुकिंग केल्यानंतरच तत्काळ ई-मेल आयडीवर तिकीट पाठविले जाते. ई-तिकीट केवळ कन्फर्म आणि आरएसीसाठी दिले जाते. तिकीट बुक करण्यासाठी ओळखपत्र सादर करणे अनिवार्य असते. तुम्ही तिकीट बुक करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर तिकीट पाठविले जाते.

प्रवासापूर्वीच हरवलं रेल्वेचं तिकीट, राहा टेन्शन फ्री; वाचा- नेमकं काय करावं?
Follow us on

नवी दिल्ली- तुम्ही रेल्वे प्रवासासाठी मोठ्या तयारीने निघालात. रेल्वे प्रवास सुरू होण्यासाठी अवघे काही मिनिटं शिल्लक असताना तुमचे तिकीटच हरविल्याचे लक्षात येतं. तुमच्या मोबाईल किंवा मेलवर तुम्हाला कन्फर्म तिकीटाचा (Train confirm ticket) मेसेजही नसतो. अशावेळी तुम्हाला आर्थिक भुर्दंडासोबत मनस्तापाला सामोरे जावे लागते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या अडचणींवर मार्ग काढला आहे. रेल्वेने ई-टिकट (E-ticket) आणि आय-टिकट (I-ticket) दोन्ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केल्या आहेत. ई-तिकीट हे आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवरुन बुक केले जाते. बुकिंग केल्यानंतरच तत्काळ ई-मेल आयडीवर तिकीट पाठविले जाते. ई-तिकीट केवळ कन्फर्म आणि आरएसीसाठी दिले जाते. तिकीट बुक करण्यासाठी ओळखपत्र सादर करणे अनिवार्य असते. तुम्ही तिकीट बुक करताना दिलेल्या मोबाईल नंबरवर तिकीट पाठविले जाते. मोबाईल तिकिटाला हार्ड कॉपी तिकीटाप्रमाणेच समान महत्व दिले जाते.

ई-तिकीट गहाळ झाल्यास काय कराल?

• IRCTC वेबसाईट वर तुमचा आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग-इन करा
• बुकिंग हिस्ट्री (Booking History) टॅब तपासा
• तुमचे प्रारंभीचे आणि गंतव्य स्थानक टाका
• ई-तिकिटची प्रिंट घ्या

आय-तिकीट (I-ticket)

तुमच्या पत्त्यावर कुरिअरद्वारे प्राप्त होणाऱ्या तिकिटाला आय-तिकीट म्हटले जाते. तुमच्यापर्यंत तिकीट पोहचण्यासाठी किमान 2-3 दिवसांचा अवधी लागतो. तुमच्या प्रवासाच्या 3-4 दिवसांपूर्वी आय-तिकीट बुक करा. आय-तिकीट कन्फर्म, आरएसी आणि वेटिंग तिन्ही कॅटेगरी साठी दिले जाते. तुमच्या पत्त्यावर तिकीट प्राप्त झाल्यास तुमचे प्रवासाचे तिकीट कन्फर्म झाल्याचे मानले जाते.

आय-तिकीट हरविल्यास काय करावे?

1. आय-तिकीट हरविल्यास त्वरित ड्युप्लिकेट तिकीट घेणे आवश्यक आहे. आरक्षण खिडकीत आय-तिकीट मिळते. तिकीट हरविल्यास पुढीलप्रमाणे कृती करा-
2. आरक्षण खिडकीत जा
3. स्टेशन मास्टरच्या नावे अर्ज करा. ज्यामध्ये तुमचा पीएनआर नंबर, प्रवास कुठून ते कुठपर्यंत, प्रवाशांची नावे, वय, लिंग यांचा तपशील द्या.
4. तुमच्या अर्जासोबत ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत जोडणे अनिवार्य आहे. तुमच्या ओरिजनल तिकिटावेळी दिलेलाच पुरावा असणे आवश्यक आहे.
5. ड्युप्लिकेट तिकिटासाठी असणारे शुल्क जमा करा.
6. तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रेल्वे तिकीट काउंटरवरुन ड्युप्लिकेट तिकीट दिले जाईल. मूळ ओळखीच्या पुराव्यासोबत तुमचे ड्युप्लिकेट तिकीट सोबत बाळगा.

संबंधित बातम्या

विनाकारण रेल्वेची साखळी ओढाल, सरकारी नोकरीला मुकाल; वाचा महत्वाचा नियम

‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं: सलग पाचव्या दिवशी मार्केटमध्ये तेजी, टाटा स्टील चकाकले!

टीसीएसचे पुन्हा ‘बायबॅक’: पाच वर्षातील विक्रमी आकडा, कमाईची बंपर संधी!