नवी दिल्ली :दारात आलेल्या लक्ष्मीकडे पाठ करायची नसते ते नशीबाने लॉटरी (Lottery) लागली इथपर्यंतच्या अनेक म्हणींचा आपल्या समाजावर परिणाम दिसून येतो. या म्हणी अनुभवातून आल्या आहेत. त्यामागील अनुभवाची जाणीव न ठेवताच तुम्ही अव्यवहारी वागलात तर मात्र तुम्ही पायावर धोंडा पाडून घेता आणि एवढा अनुभवी माणूस, शिकलेला माणूस अन् त्याला एवढी साधी गोष्ट कळू नये अशी दुषणं त्याला समाज देतो. असंच एक प्रकरण राज्यात घडलं आहे. अचानक बँक खात्यात (Bank Account) काही हजार ते लाखो, कोटी रुपये आले तर तुम्ही काय कराल ? आहो निदान शहानिशा तर कराल की नाही. की रक्कम कोठून आली. कोणी एवढे रुपये खात्यात जमा केले. त्या खातेदाराचे नाव तर विचाराल ज्याने तुमच्या खात्यात लाखो रुपये टाकले आहेत म्हणून. पण औरंगाबादच्या (Aurangbad) पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील जनार्दन औटे यांच्या खात्यात जनधन खात्यात अचानक 15 लाख रुपये जमा झाल्यावर त्यांनी कसली ही शहानिशा न करता यातील अर्धीअधिक रक्कम खर्चून टाकली की, पंतप्रधानाने आपल्या खात्यात 15 लाख रुपये धाडल्याचा त्यांचा अजब गैरसमज झाला. शाहनिशा न करताच त्यांनी त्यातील रक्कम खर्चली आणि….मग काय …ताप व्हायचा तो झालाच की
तुमच्या खात्यात अचानक काही हजार ते लाखो कोटी रुपये आले, असे कधी झाले आहे का? तसे असेल तर तुम्ही त्याचे काय केले? तुम्ही जनार्दन औटे यांच्यासारखी चूक तर केली नाही ना ? आणि असा लाखोंचा दुर्मिळ योगायोग सांगून थोडीच होणार. तेव्हा असा काही योगायोग तुमच्यासोबत घडलाच तर या गोष्टी लक्षात ठेवा
अशा प्रकारे अचानक तुमच्या खात्यात पैसे आले. तर सगळ्यात आधी मनाशी खूनगाठ बांधा. बाप्पा हो, हा इतका पैसा आपल्याला पाठविला कोणी असेल याची खातरजमा अगोदर करा. कशाला पाठवला, याचा विचार करा. या रक्कमेतील एक रुपयाही खर्च होत नाही, कारण तो तुमचा पैसा नाही, त्यामुळे कायदेशीर आधारावर तुम्हाला तो खर्चता येत नाही आणि खर्चला तर तुमला कोणी सोडत नाही. चूक कोणाची का असेना पण तुम्ही मात्र माती खायची नाही म्हणजे नाही. नाही तर पुढे तुमचा कार्यक्रम ठरलेला आहेच. अनेक वेळा बँक कर्मचाऱ्याच्या तांत्रिक चुकांमुळे किंवा मानवी चुकीमुळे असे प्रकार होतात, अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात पैसे आले म्हणजे ते तुमचे झाले असे होत नाही. ही तांत्रिक चूक लक्षात येताच बँक तुम्हाला ही रक्कम परत मागणारच, जर तुम्ही ती खर्चून टाकली तर एवढी मोठी रक्कम तुम्हाला उभी करणे हा पोरासोराचा खेळ आहे का ? तेव्हा कारभारी आगाऊ डोकं चालवू नका. ही हुशारी तुम्हाला अडकवल्याशिवाय राहणार नाही बरं का.
जर अशी रक्कम अचानक तुमच्या खात्यात आली असेल तर अगोदरच रक्कमेची खातरजमा करा. तुमचा असला काही व्यवहार ठरला नसेल, झाला नसेल तर समजून जा ही रक्कम चुकून तुमच्या खात्यात आली आहे ते. ही रक्कम बेकायदेशीरपणे तुमच्या खात्यात आली आहे, चूकन आली आहे याची खातरजमा झाल्यावर संबंधित बँकेच्या शाखेशी संपर्क साधा. त्यांना या रक्कमेविषयी सर्व माहिती द्या. एवढी मोठी रक्कम आली म्हणजे हुरळून जाऊ नका. अशी चुकून लागलेली लॉटरी तुमचे पानीपत करु शकते, एवढं लक्षात ठेवा.
अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात पडल्यावर हुरळून जाऊ नका. ही रक्कम काढण्याचा , खर्च करण्याचा विचार करु नका. अथवा इतर कोणाला वापरायला देऊ नका. ही रक्कम हस्तांतरीत करु नका. या रक्कमेविषयी शक्यतोवर कसलाही व्यवहार करु नका. कारण ही रक्कम तुमची नाही. चुकून ती तुमच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही रक्कम खर्च केली तर कायदेशीरित्या त्याची भरपाई तुम्हाला करुन द्यावीच लागते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जनार्दन औटे कोण आहेत, , त्यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर जनार्दन औटे आहे. महाराष्ट्रातील औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ते शेतकरी आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अचानक त्यांच्या जनधन खात्यात 15 लाख रुपये आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत शेतक-यांच्या खात्यात 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आश्वासन पाळले आणि आपल्या खात्यात 15 लाख रुपये आले असा त्यांचो गोड गैरसमज झाला. त्यांनी यातील 9 लाख रुपये खर्चून स्वतःचे घरं बांधले. आता बँक त्यांच्याकडे ही चुकून हस्तांतरीत केलेली रक्कम मागत आहे.
Navneet Rana : राज्यातलं आणखी एक भांडण दिल्ली दरबारी, नवनीत राणा लोकसभेत का कडाडल्या?