e-Passport: बाहेरगावी प्रवासाठी लवकरच ई-पासपोर्ट! 4 पैकी तुम्ही कोणत्या प्रकारचा पासपोर्ट घ्यायला हवा?

| Updated on: Feb 02, 2022 | 6:32 PM

What is ePassport: बाहेरगावी प्रवास करण्यासाठी ही ई -पासपोर्ट लवकरच उपलब्ध होतील. या ई -पासपोर्ट च्या सहाय्याने तुमचा प्रवास सुखकर होईल आणि इमिग्रेशन काऊंटरवरील गर्दी सुद्धा आटोक्यात येईल परंतु तुम्हाला माहिती आहे का देशांमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट दिले जातात चला तर मग जाणून घेऊया हे 4 प्रकार कोणकोणते आहेत..

e-Passport: बाहेरगावी प्रवासाठी लवकरच ई-पासपोर्ट! 4 पैकी तुम्ही कोणत्या प्रकारचा पासपोर्ट घ्यायला हवा?
पासपोर्ट
Follow us on

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ई-पासपोर्ट (e-Passport) बद्दलची घोषणा केली त्यांनी सांगितले की बाहेर गावी परदेशी प्रवासासाठी लवकरच ई- पासपोर्ट उपलब्ध केले जातील. या ई-पासपोर्ट मध्ये एक चीप (Chip) असेल. या चीपच्या सहाय्याने आपल्या प्रवास अगदी सुखकर होईल आणि इमिग्रेशन अकाऊंटवर (Emigration counter) जमा होणारी गर्दी सुद्धा यामुळे कमी केली जाईल त्याच बरोबर अर्थसंकल्प सादर करण्या आधीच या ई पासपोर्ट बद्दल अनेक प्रकारची चर्चा करण्यात आल्या होत्या. हा पासपोर्ट एका सामान्य पासपोर्ट प्रमाणेच असेल परंतु यामध्ये इलेक्ट्रॉनिक चीप लागलेली असेल. या चीपमध्ये प्रवाशी निगडित असलेली माहिती समाविष्ट केली गेली असेल. चीप मुळे काउंटरवर अतिरिक्त प्रमाणामध्ये निर्माण होणाऱ्या गर्दीवर लगाम लावला जाईल आणि कमी वेळातच व्हेरिफिकेशन सुद्धा होईल.या सगळ्या गोष्टी झाल्या ई पासपोर्ट बद्दल परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारचे पासपोर्ट दिले जातात त्याबद्दल अनेकांना अद्याप सुद्धा माहिती नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 4 वेगवेगळ्या पासपोर्ट बद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

1) सामान्‍य पासपोर्ट (Ordinary Passport)

पासपोर्ट भारताच्या ऑफ‍िशियल वेबसाइट नुसार, सामान्‍य पासपोर्ट 36 ते 60 पानांचे असते. हा पासपोर्ट निळ्या रंगाचा असतो. हा पासपोर्ट ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध केलेला असतो तसेच या पासपोर्टची वैधता 10 वर्षापर्यंत असते. माइनर्ससाठी या पासपोर्टची वैधता 5 वर्षापर्यंत असते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पासपोर्टची वैधता 10 वर्षापर्यंत चा असलेला पासपोर्ट दिला जातो.

2) डिप्‍लोमेटिक पासपोर्ट (Diplomatic Passport)

भारत सरकार द्वारे डिप्‍लोमेटिक पासपोर्ट काही विशेष अधिकृत लोकांनाच दिला जातो.या पासपोर्टला वाणिज्य दूतावास किंवा राजकारणी यांना दिला जातो, त्या पासपोर्टचा रंग मरून असतो. सीएनबीसी यांच्या रिपोर्टनुसार जर एखाद्या व्यक्तीला डिप्लोमॅटिक पासपोर्ट दिला जातो तर अशावेळी ती व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी सुद्धा हा पास मिळवू शकतो या पाससाठी इमिग्रेशन करण्यासाठी सर्वसाधारण प्रवाशी प्रमाणे लाईन लावावी लागत नाही.

3) ऑफ‍िशियल पासपोर्ट (Official Passport)
या प्रकारचा पासपोर्ट फक्त सरकारी कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध केला जातो. या पासला सर्विस पासपोर्ट असे सुद्धा म्हणतात. हा पास जेव्हा बनवला जातो तेव्हा एखादेवसरकार एखाद्या व्यक्तीला सरकारी कामासाठी बाहेरगावी कामानिमित्त पाठवते अशावेळी हा पास आवर्जून बनवला जातो.

4) अस्थायी पासपोर्ट (Temporary  Passport)
तुमच्या सामान्य पासपोर्ट हरवला असेल तर अशावेळी अस्थायी पासपोर्ट बनवला जातो. जोपर्यंत प्रवाशी आपल्या देशामध्ये परत येत नाही तोपर्यंत हा पासपोर्ट प्रवाशी वापरू शकतो.

ई-पासपोर्ट चे फायदे कोणते?

प्रवास करते वेळी इमिग्रेशन काउंटरवर पासपोर्टच्या माध्यमातून स्कॅनिंग केले जाईल येथे तासनतास लागलेल्या मोठ्या रांगेत उभे राहण्यापासून तुमची सुटका होईल.

– काउंटरवर वेरिफिकेशन साठी जास्त वेळ लागणार नाही म्हणून प्रवाशांचा वेळ वाचेल.

– बनावट पासपोर्ट लाल लगाम लागेल त्याचबरोबर बनावट पास सुद्धा उपलब्ध होणार नाहीत.

– ही पासपोर्ट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांना नेहमी सोबत घेऊन चालावे लागणार नाही.

– सध्या “या” देशांमध्ये दिला जातो ई- पासपोर्ट

जगातील अनेक देशांमध्ये ई -पासपोर्टचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ई पासपोर्टची सुरुवात 1998 मध्ये मलेशिया मध्ये झाली होती त्यानंतर अमेरिका ब्रिटन, जपान आणि जर्मनी सारख्या अनेक देशांमध्ये या प्रकारचा पासपोर्टचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येऊ लागला. भारतामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी लवकरच ई- पासपोर्ट याच वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Budget 2022 | स्वस्त नाही, वजनाने हलके झाले Gas Cylinder, कंपोझिट गॅस सिलिंडर म्हणजे काय?

Income Tax : इनकम टॅक्स जैसे थे आहे की खरंच बदललाय? सोप्या शब्दांत समजून घ्या!

Share Market : शेअर बाजारात पुन्हा फॉर्मात? सेंन्सेक्समध्ये 695 अंकाची वाढ! बँकिंग स्टॉक्सही वाढले