तुम्ही वाहन चालवताना किंवा कार चालवताना काही गोष्टींची काळजी गेतली पाहिजे. त्यातही कार चालवणारे 90 टक्के लोक असे आहेत ज्यांना हे माहितच नाही की कारमध्ये सिगारेट ओढल्यास Traffic Challan कापले जाऊ शकते. तुम्हीही गाडी चालवत असाल तर वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही कार चालवताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला महागात पडू शकते, जाणून घेऊया कारमध्ये धूम्रपान केल्यास किती दंड आकारला जाऊ शकतो? याविषयी विस्ताराने.
भरधाव वेगाने वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, या सर्वांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. पण कार चालवताना सिगारेट ओढण्यावर दंड आकारला जातो की नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित आहे का? वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.
वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला वाहतुकीच्या सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. परंतु तरीही 90 टक्के लोक असे असतील ज्यांना हे देखील माहित नसेल की कारमध्ये धूम्रपान केल्याने Traffic Challan देखील कापले जाऊ शकते.
Traffic Challan कोणत्या कलमाखाली?
वाहनात सिगारेट ओढल्यास डीएमव्हीआर 86.1 (5)/177 MVA अंतर्गत प्रथमच 500 रुपयांचे Traffic Challan कापले जाऊ शकते. जर तुम्ही ही चूक पुन्हा केली तर पुढच्या वेळी तुम्हाला 1500 रुपयांचा Traffic Challan भरावा लागू शकतो.
Traffic Challan वाढतच जाईल
Traffic Challan कापले जाऊ नये, असे वाटत असेल तर गाडी चालवताना किंवा गाडी थांबवल्यानंतरही गाडीत सिगारेट ओढणे टाळावे. जर तुम्ही ही चूक अशीच करत राहिलात तर तुमचे Traffic Challan वाढतच जाईल.
CNG कार चालवणाऱ्यांनी सावध राहावे
आता तुम्ही विचार करत असाल की फक्त CNG कार मालकांनीच सावध राहण्याची गरज का आहे? कारण समजा जर गॅस गळती झाली आणि तुम्ही त्यावेळी गाडीत बसून धूम्रपान करत असाल तर गाडीचा स्फोट होऊ शकतो. अशावेळी खिशापेक्षा तुमच्या जीवाला जास्त धोका असू शकतो.
अनेक देशांमध्ये धूम्रपानावर बंदी
अनेक देशांमध्ये कारमध्ये धूम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे. सिगारेटचा धूर अनेक हानिकारक रसायनांनी भरलेला असतो जो कारमधील इतर प्रवाशांसाठीही हानिकारक ठरू शकतो. सिगारेटच नाही तर कारमध्ये मद्यपान केल्यास तुमचे Traffic Challan कापले जाऊ शकते.