नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसाठी प्रत्येकवेळीआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीला देशातील पेट्रोल आणि जबाबदार धरले जाते. कच्च्या तेलात गेल्या काही आठवड्यांपासून वाढ दिसून येत आहे. भारत कच्चे तेल आयात करतो आणि त्यातून डिझेल-पेट्रोल बनवले जाते. कच्च्या तेलाची खरेदी लिटरमध्ये नव्हे तर बॅरलमध्ये होते.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकन बाजारात ब्रेंट क्रूड 0.86 डॉलरने वाढून 84.86 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. याचा अर्थ $ 84.86 साठी बॅरल. WTI क्रूडमध्येही $ 0.97 ची वाढ दिसून आली. तेही $ 82.28 प्रति बॅरलवर स्थिरावले.
एका बॅरलमध्ये 158.987 लिटर खनिज तेल असते. सध्याच्या किंमतीच्या आधारावर, जर तुम्ही एक लिटर कच्चे तेल (ब्रेंट क्रूड) खरेदी केले तर तुम्हाला सुमारे 40 रुपये मोजावे लागतील. आपल्याला माहित आहे की भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ठरलेल्या असल्याने सर्व व्यवहार डॉलर्समध्ये होतात. त्यामुळे भारत कच्च्या तेलाची पैसे डॉलर्समध्ये चुकते करतो.
जर डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत राहिला तर आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतील. यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढतो. अशा परिस्थितीत सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून त्याची किंमत वसूल करते.
देशातील इंधनाच्या किमती गेल्या 15 महिन्यांत 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे भविष्यात देशात जास्त मायलेज देणाऱ्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी श्रेणीती गाड्यांची मागणी वाढू शकते, असे एचएसबीसी ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेने सुस्साट प्रवास करत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला लगाम बसला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सोमवारी इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना संकटामुळे अगोदरच रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वेगाने वाढ झाली आहे. डिझेलची किंमत वाढल्याने PMPML ची संचलन तूट तब्बल 600 ते 700 कोटी इतका होण्याचा अंदाज असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. गेल्यावर्षी ही तूट 497 कोटी होती. मात्र, यंदा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या दरात वाढ झाल्याने वित्तीय तुटीचा आकडा वाढला आहे.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?