मेडिक्लेम घेताना ‘या’ गोष्टी तपासा, अन्यथा होईल नुकसान
Mediclaim | आजारपणाच्या काळात आरोग्य विमा किती फायदेशीर ठरू शकतो, ही बाब अनेकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आरोग्य विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, व्यवस्थित चौकशी न करता आरोग्य विमा घेतल्यास भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-
-
कोरोना संकटानंतर कधी नव्हे ते आरोग्य क्षेत्राला अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात आरोग्य विमा किती फायदेशीर ठरू शकतो, ही बाब अनेकांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आरोग्य विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, व्यवस्थित चौकशी न करता आरोग्य विमा घेतल्यास भविष्यात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
-
-
मेडिक्लेम बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजार आणि रोग. असे बरेच रोग आहेत, जे मेडिक्लेममध्ये समाविष्ट केले जात नाहीत. म्हणूनच, त्या रोगांबद्दल आपण आधीच नीट विचारून घेतले पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला भविष्यात मेडिक्लेम पॉलिसी वापरण्याची आवश्यकता असेल, तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत, कोणकोणते रोग यात समाविष्ट आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
-
-
जेव्हा, आपण पॉलिसी खरेदी करता, तेव्हा दीर्घकाळाचा विचार करा. मेडिक्लेम घेण्यापूर्वी त्या कंपनीची संपूर्ण माहिती वाचा आणि एखाद्या चांगल्या कंपनीकडूनच पॉलिसी विकत घ्या. वास्तविक, काही मेडिक्लेममध्ये असा नियम आहे की, हळू हळू त्यात काही रोगा समाविष्ट केले जातात. जर, आपण मधेच पॉलिसी कंपनी बदलत राहिलो, तर बर्याच वर्षांपासून प्रीमियम भरल्यानंतरही काही रोग आपल्या पॉलिसीमध्ये समविष्ट केले जाणार नाहीत. म्हणून, एकाच चांगल्या कंपनीची पॉलिसी सुरु ठेवण्याचा प्रयत्न करा
-
-
जेव्हा आपण पॉलिसी खरेदी करता, तेव्हा आपण त्यासोबतचा नियमांचा तक्ता वाचला पाहिजे. ज्यामध्ये, किती वर्षानंतर पॉलिसीमध्ये कोणते रोग जोडले जातील, याची माहिती दिलेलेई असते. उदाहरणार्थ, ज्या दिवशी आपण पॉलिसी घेता त्या दिवशी अपघात प्रकरणातील क्लेम सुरू होतात. यानंतर, काही रोग एका महिन्यानंतर सामील होतात आणि काही रोग 2 वर्षानंतर सामील केले जातात. अशा परिस्थितीत याबद्दल आधीपासूनच माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
-
-
पॉलिसी खरेदी करताना आपल्याला आधीपासूनच काही समस्या असल्यास किंवा कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा कोणतीही इतर समस्या असल्यास, त्याची संपूर्ण खरी माहिती द्या. या व्यतिरिक्त आपण जर धुम्रपान करत असाल तर, पॉलिसीच्या वेळी त्याबद्दलही माहिती द्या. तसेच, जर कोणत्याही आजारावर आधीच उपचार सुरू असतील, तर तेही सांगा.
-
-
medical