RBI News on 2000 Note : सर्व समजलं हो, पण या नकली नोटेचं काय करु? बँक काय घेणार ॲक्शन

| Updated on: May 20, 2023 | 12:13 PM

RBI News on 2000 Note : तुमच्याकडे चुकून 2000 रुपायांची नोट सापडली तर, आता काय करणार, बँकेच्या काऊंटवर तर लपविता पण येणार नाही, बँक काय करेल तुमच्यावर कारवाई...

RBI News on 2000 Note : सर्व समजलं हो, पण या नकली नोटेचं काय करु? बँक काय घेणार ॲक्शन
Follow us on

नवी दिल्ली : अनेकांना घराताच नोटांचे बंडल लावण्याचा फार छंद असतो. 2000 रुपयांच्या (2000 Rupee Note) मोठ्या प्रमाणात नोटा असतील, तर ही बातमी तुमच्यासाठीच. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून हळूहळू बाहेर करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत बँकेत या नोटा जमा करता येईल. या 23 मेपासून बँकेसमोर रांगेत उभे राहण्याची वेळ अनेक भारतीयांवर येणार आहे. 2000 रुपयांच्या नकली नोटांचे (Fake Note) पेव फुटल्याने केंद्र सरकारने गेल्या वर्षीपासूनच ही नोट बँकामार्फत चलनातून कमी केली होती. आता तुम्ही बँकेत या नोटा बदलविण्यासाठी गेलात आणि त्यात चुकून एखादी नोट खरंच नकली निघाली तर काय करणार? बँक तुमच्यावर काय कारवाई करेल?

आरबीआयचा अहवाल
RBI च्या वार्षिक अहवालानुसार, 31 मार्च 2022 रोजीच्या आकडेवारीवरुन, 2,000 रुपयांच्या  एकूण 214.20 कोटी नोटा चलनात आहेत. एकूण चलनाचा हा आकडा 1.6% आहे. त्यांचे मूल्य 4,28,394 कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा असूनही त्या मात्र व्यवहारातून का गायब झाल्या, हा खरा प्रश्न आहे

नकली नोटा
दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या. लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी तर त्या दडवून ठेवण्यात येत नाही ना, असा एक मतप्रवाह आहे.

तुमच्याकडे नकली नोट सापडली तर..

  1. आरबीआयच्या निर्देशानुसार, नकली नोट आढळल्यास केंद्रीय बँकेने त्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत
  2. बँकेच्या काऊंटरवर नकली नोटांची मशिनद्वारे पडताळणी करता येईल
  3. तुमच्याकडे नकली नोट सापडल्यास ग्राहकांना त्या बदल्यात कोणतीच नोट मिळणार नाही
  4. बँक या नोटेवर नकली म्हणून मोहर लावेल. ही नोट जप्त करण्यात येईल
  5. बँक कर्मचारी या नोटेचा संपूर्ण तपशील एका रजिस्टरमध्ये नोंदवतील
  6. याविषयी तुमच्याकडून एक अर्जावर माहिती घेण्यात येईल
  7. तुमच्या ओळखपत्राची कॉपी ही घेण्यात येईल
  8. या नोटांविषयीची माहिती पोलिसांना पण देण्यात येईल

गाईडलाईन्स काय सांगते

  1. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी नकली नोट स्वीकारुन चलनात आणणे, ती नष्ट करणे, करण्याचा प्रयत्न करणे ही बँकेची चूक मानण्यात येईल. तसेच ही नोट पुन्हा एटीएममधून अथवा इतर रुपातून बँकेतून व्यवहारात, चलनात आल्यास कर्मचाऱ्यावर मोठा दंड लागेल
  2. बँकेच्या काऊंटरवर तपासणी करतानाच ही नकली नोट आढळल्यास विहित स्वरुपात त्याची माहिती भरुन घेण्यात येईल
  3. मार्गदर्शक सूचनांनुसार यासंबंधीची माहिती पोलिसांना देण्यात येईल
  4. एखाद्या ग्राहकाने बँकेतच दुसऱ्याकडे नोटा दिल्यास, एखाद्याकडे एक्सचेंज केल्यास कारवाईचा कुठलाच मनस्ताप त्या ग्राहकाला होऊ नये आणि बदमाशाला पकडण्यासाठी बँकेत सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. तसेच त्याचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे