WhatsApp Down | व्हॉट्सॲप बंद! मग ‘या’ ॲप्सवरून करा मेसेज; व्हा सहकाऱ्यांशी कनेक्ट

| Updated on: Oct 25, 2022 | 2:05 PM

व्हॉट्सॲप सर्व्हिस आज दुपारी 12.36 वाजल्यापासून डाऊन आहे. त्याबद्दल 25 हजाराहून अधिक लोकांनी तक्रार केली आहे. तसेच व्हॉट्सॲप बंद असल्याचा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

WhatsApp Down | व्हॉट्सॲप बंद! मग या ॲप्सवरून करा मेसेज; व्हा सहकाऱ्यांशी कनेक्ट
व्हॉट्सॲप बंद! मग 'या' ॲप्सवरून करा मेसेज; व्हा सहकाऱ्यांशी कनेक्ट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: भारतासहीत जगभरात व्हॉट्सॲपचं (WhatsApp) सर्व्हर बंद झालं आहे. त्यामुळे अनेकांना मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. व्हिडीओ कॉलही करता येत नाहीये. भारतात (india) तर व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर केला जातो. पण व्हॉट्सॲप बंद झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. मात्र, असं असलं तरी तुम्ही पर्याय म्हणून इतर ॲप्सचा (Apps) वापर करू शकता. त्यावरून आपल्या सहकाऱ्यांना मेसेज करून त्यांच्याशी कनेक्ट राहू शकता.

व्हॉट्सॲप सर्व्हिस आज दुपारी 12.36 वाजल्यापासून डाऊन आहे. त्याबद्दल 25 हजाराहून अधिक लोकांनी तक्रार केली आहे. तसेच व्हॉट्सॲप बंद असल्याचा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. यापूर्वीही अनेकदा व्हॉट्सॲप सर्व्हिस डाऊन झाली होती. पण यावेळी एक तास उलटून गेला तरी व्हॉट्सॲप सुरू झालेलं नाही. त्यामुळे यूजर्स चांगलेच त्रस्त झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतासहीत मिडल ईस्ट आणि आफ्रिकेसह देशातील अनेक भागात व्हॉट्सॲप डाऊन झालं आहे. मात्र, असं असलं तरी त्रस्त होण्याचं कारण नाही. व्हॉट्सॲप सारखीच सेवा देणाऱ्या इतर ॲप्सवरूनही तुम्ही आपल्या सहकाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहू शकता.

टेलिग्राम

व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून टेलिग्रामकडे पाहिले जाते. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला व्हॉट्सॲपपेक्षा अधिक फिचर्स मिळतात. यावर तुम्हाला चॅनल्स आणि इतर फिचर्स मिळतात. व्हॉट्सअपपेक्षा चांगली फिचर्स असूनही लोक या ॲप्सचा अधिक वापर करत नाही. मात्र, आता व्हॉट्सॲप डाऊन असल्याने ते वापरण्यास काही हरकत नाही. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे ॲप आहे.

सिग्नल

सिग्नल ॲपचाही व्हॉट्सअपला पर्याय म्हणून अधिक वापर होतो. प्रायव्हेसी आणि सेक्युरीटीमध्ये हे ॲप्स व्हॉट्सॲपपेक्षा अधिक फिचर्स देतं. तुम्हाला व्हॉट्सॲपला दमदार पर्याय हवा असेल तर तुम्ही सिग्नलचा वापर करू शकता. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. हे ॲप फ्रिमध्ये डाऊनलोड होतं.

डिस्कोर्ड

डिस्कोर्डची सुरुवात इन्स्टंच मॅसेंजिग ॲप म्हणून झाली नव्हती. फेलो गेमर्स चॅटिंगसाठी हे ॲप तयार करण्यात आलं होतं. मात्र, व्हॉट्सॲपला पर्याय म्हणूनही त्याचा वापर करू शकता. याचे डीएम फिचर्स यूजर्सच्या पसंतीला उतरलेलं आहे. हे ॲप, अँड्राईड, विंडोस, आयओएस, लिन्यूक्स आणि मॅकओएसवरही वापरू शकता.

स्नॅपचॅट

स्नॅपचॅट हे ॲप व्हॉट्सअप सारखं नाही. मात्र तुम्हाला इन्स्टाग्राम सारखी फिलिंग या ॲपमुळे येईल. याचा वापर तुम्ही इन्स्टंट मेसेजिंगसाठी करू शकता. हे तुम्हाला फ्रि डाऊनलोड करता येईल.