रेल्वेच्या तिकीटावर कोणता कोड म्हणजे कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त असतात? वाचा 4 कोडबद्दल

| Updated on: Sep 15, 2021 | 2:16 PM

पीएनआर म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड. तुमच्या तिकीटावरचा हा सर्वात महत्वाचा कोड आहे. रिजर्वेशन तिकीटाच्या डाव्या बाजुच्या वरच्या भागात पीएनआर नंबर लिहिलेला असतो.

रेल्वेच्या तिकीटावर कोणता कोड म्हणजे कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त असतात? वाचा 4 कोडबद्दल
रेल्वेच्या तिकीटावर कोणता कोड म्हणजे कन्फर्म होण्याचे चान्सेस जास्त असतात? वाचा 4 कोडबद्दल
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाईफलाईन मानलं जातं. रोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करतात. भारतीय रेल्वेचं जाळं देशभर पसरलंय. आपल्याला ज्यावेळेस रेल्वेनं प्रवास करायचा असतो, त्यावेळेस आधी तिकीट बुक करावं लागतं. म्हणजे आपल्याला सीट मिळते. ती मिळाली तरच प्रवास आरामदायी, सुखकर होतो. आपण सर्वानीच कधी ना कधी स्लीपर, AC, चेयर कार, सेकंड सिटींगनं प्रवास करण्यासाठी रिजर्वेशन तर केलेलच असणार. रेल्वेचं तिकीट हातात आल्यानंतर आपण त्यावरचं फार फार तर तिकीट कन्फर्म झालंय का, कोच नंबर किती, सीट नंबर किती अशा काही प्रमुख गोष्टी तपासतोत. पण ज्यावेळेस तिकीट कन्फर्म नसतं, त्यावेळेस काय काय बघतोत? आपलं तिकीट कसं कन्फर्म होईल याची माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच रेल्वेच्या तिकीटावर जे वेगवेगळे कोड लिहिलेले असतात. त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं तिकीट वेटींग लिस्टमध्ये असेल तरीसुद्धा वेटींगच्याही अनेक कॅटेगरी आहेत. (Which code is more likely to be confirmed on a train ticket, Read about code 4)

PNR

पीएनआर म्हणजे पॅसेंजर नेम रेकॉर्ड. तुमच्या तिकीटावरचा हा सर्वात महत्वाचा कोड आहे. रिजर्वेशन तिकीटाच्या डाव्या बाजुच्या वरच्या भागात पीएनआर नंबर लिहिलेला असतो. याच कोडवरुन हे स्पष्ट होतं की, तिकीट नेमकं कुणाचं आहे? तुमच्या तिकीटावर जो पीएनआर नंबर असतो तोच टीसीकडेही असतो. त्यावरुनच तो तुमचं तिकीट चेक करतो.

GNWL

ट्रेनच्या तिकीटावर लिहिलेल्या जीएनडब्लूएलचा अर्थ असतो जनरल वेटींग लिस्ट. तिकीटावर हा कोड तेव्हा लिहिला जातो जेव्हा एखादा प्रवाशी त्याचा प्रवास सुरुवातीच्या स्टेशनपासून करतो किंवा त्याच्या आसपासच्या. वेटींग लिस्टमध्ये हा सर्वात सामान्य आहे. असे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अधिक असते.

TQWL

टीकेडब्लूएल म्हणजेच तत्काल कोटा वेटींग लिस्ट. यालाच 2016 च्या आधी CKWLम्हणून ओळखलं जायचं. जर तत्काल लिस्टमधलं कुठलही तिकीट कॅन्सल झालं, तर त्या जागी हे तिकीट कन्फर्म होण्याची प्राथमिकता सर्वाधिक असते. अशी तिकीटं सर्वात आधी कन्फर्म होतात. ह्या कॅटगरीत रिजर्वेशन अगेनेस्ट कॅन्सलेशन म्हणजेच RAC चं ऑप्शन नाही. हे तिकीट कन्फर्म झालच नाही तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात परत येतात.

PQWL

पीक्यूडब्लूएलचा अर्थ आहे पूल्ड कोटा वेटींग लिस्ट. या अंतर्गत लहान स्टेशनसाठी कोटा जारी केला जातो. ह्या कॅटेगरीतलं तिकीट कन्फर्म व्हायचं असेल तर कुठलं तरी तिकीट कॅन्सल व्हावं लागतं. यात त्या प्रवाशांचं तिकीट बूक केलं जातं, जे सुरुवातीच्या स्टेशनपासून थोड्याच अंतरावर जाण्यासाठी प्रवास करतात. (Which code is more likely to be confirmed on a train ticket, Read about code 4)

इतर बातम्या

मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी, आंदोलनाची नौटंकी बंद करा; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

आधी मुख्यमंत्री बदलले, आता संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार, गुजरातमध्ये भाजपचा प्लॅन, नाराज MLA रुपाणींच्या घरी!