मुंबई : कोणतेही कर्ज घेताना किंवा आर्थिक गोष्टी खरेदी करताना बँक आपल्याकडे कॅन्सल चेक मागतात. आपण तो सहजपणे देतो. पण तुम्हाला माहित आहे का की बँका तुमच्याकडून कॅन्सल चेक ( Cancelled Cheque ) का मागतात. हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. तर चला मग जाणून घेऊया या मागचं कारण?
जेव्हा आपण बँकासोबत व्यवहार करतो तेव्हा वित्तीय सेवा प्रदाता कंपनी किंवा बँक आपल्याकडे रद्द केलेला चेक म्हणजेच कॅन्सल चेक मागते. त्या चेकवर मग आपण क्रॉस दोन रेषा मारुन त्यामध्ये कॅन्सल असं लिहून देतो.
ग्राहकाच्या तपशीलाची पडताळणी करण्यासाठी बँक आणि वित्तीय कंपन्या कॅन्सल चेक मागतात. कारण चेकवर ग्राहकाचे सर्व तपशील दिलेले असतात. जसे की बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पूर्ण नाव आणि स्वाक्षरी. जेणेकरून ग्राहकाचा तपशील सहजपण बँकांना पडताळणे सोपे होते.
रद्द केलेल्या चेकने तुमच्या खात्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. चेकवर क्रॉस मार्क योग्यरित्या करण्यासाठी तुम्हाला याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. रद्द केलेल्या चेकसाठी नेहमी निळ्या आणि काळ्या शाईचा पेन वापरावा.
विमा खरेदी करताना.
डिमॅट खाते उघडण्याच्या वेळी.
पीएफमधून ऑनलाइन पैसे काढताना.
कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करणे.
NPS मध्ये गुंतवणूक करताना.