अनेक कुटुंबांचा आकार मोठा असतो. पारंपारिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे पालन करत एकत्र कुटुंब कबिल्याचे काम चालते. अशा मोठ्या कुटुंबासाठी एका घराची जागा कमी पडते. अशा वेळी लगतच दुसऱ्या घराचा पर्याय समोर येतो. तसेच अनेक जण हौस म्हणून ही सेकंड होम (Second Home) घेतात. कमाई जास्त असेल तर ते अतिरिक्त रक्कम दुसऱ्या घरासाठी अडकविण्यासाठी उपयोगी ठरते. कुटुंबातील किरकोळ वादातून, कलहामुळे काही जणांना सक्तीने दुसरे घर घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना वेळप्रसंगी त्यांना गृहकर्ज(Home Loan) घ्यावे लागते. दुसरं घर घेण्यात काही गैर नाही तर फक्त फायदाच होतो.दुसऱ्या घरावरही बिल्डर सवलती देतात. अगदी मोफत पार्किंगची जागा, मोफत गृहोपयोगी वस्तू, मुद्रांक शुल्कात(Stamp Duty) सवलत असे फायदेही उपलब्ध आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर गृहकर्जांचा व्याजदर (Home Loan Interest Rate) काहीसा कमी असतो, ज्यामुळे लोक सहजपणे कर्ज घेतात. आर्थिक वर्षात गृहकर्जाच्या व्याजावर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत कर वजावट मिळू शकते. स्वत:च्या मालकीच्या मालमत्तेवर कर्ज घेतल्यास अथवा गृहकर्जाच्या पैशातून 5 वर्षांच्या आत घर बांधावे किंवा 5 वर्षांच्या आत नवीन घर खरेदी केल्यास आयकर कलम 24 (ब) अंतर्गत कर वजावटीची सुविधा देण्यात येते. अन्य गृहकर्जांवरील करसवलतही मिळते. ईएमआयच्या सवलतीवर गृहकर्जे सहजपणे कर वजावट मिळवू शकतात. इन्कम टॅक्सच्या कलम 80 सी अंतर्गत होम लोनमध्ये ईएमआयच्या मूळ रकमेवर 1.50 लाख रुपयांची करवजावट मिळू शकते. गृहकर्जाच्या व्याजावर कर वजावटीचा लाभ घेता येतो.
गृहकर्ज घेऊन नवीन घर बांधून अथवा नवीन घर खरेदी करण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. नव्या घरात राहायचं नसेल तर ते भाड्याने घेऊन चांगलं उत्पन्न मिळवू शकता. घर भाड्याने देऊनही चांगली कमाई करता येते. हे कर्ज लीज फी, लायसन्स फी किंवा भाड्याच्या पैशाने फेडता येईल. समजा गृहकर्जासाठी तुम्ही जे पैसे भरत आहात, त्यापेक्षा कमी भाडे मिळत असेल, तर तो मालमत्तेचा तोटा दाखवता येतो. त्यातून कराचाही एक प्रकारे फायदा होईल. तुमचे सेकण्ड होम निवृत्तीनंतर तुमच्या उत्पन्नाचे सर्वोत्तम साधन बनू शकते.
सेकंड होम घेण्यापूर्वी एकदा व्याजदर, छुप्या शुल्काची माहिती घ्या. आपण ज्या बिल्डरकडून ते घरून घेत आहात त्याबद्दल जाणून घ्या. किती कालावधीत प्रकल्प पूर्ण होईल. तुमच्या बँकेने त्या गृहप्रकल्पाला मंजुरी दिली आहे का ते तपासा. गृहनिर्माण प्रकल्प रेराकडे (RERA) नोंदणीकृत आहे की नाही हे देखील तपासा. अशा परिस्थितीत तुम्ही मोठी जोखीम टाळाल आणि फसवणुकीचा धोकाही दूर होईल.