केंद्र सरकार राज्य (State) आणि केंद्रातील (Centre) विविध संकेतस्थळांना (Websites) मिळून एका कॉमन प्लॅटफॉर्मवर (Common Platform) आणणार आहे. Single Sign-On (SSO) या संकल्पनेवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या महत्वकांक्षी प्रकल्पात या दोन्ही यंत्रणांची संकेतस्थळे एका कॉमन प्लॅटफॉर्मवर जनतेला सेवा देतील. यामध्ये विविध शासकीय योजना (Government Schemes), त्यांचे अर्ज (Applications), विविध प्रकारचे प्रमाणपत्र (Certificate), जन्म नोंदणी (Birth Certificate) पासून तर मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate) पर्यंत सर्व सेवा उपलब्ध असतील. एवढेच नव्हे तर विविध विभागातील परीक्षांसाठीचे अर्ज, भरती प्रक्रिया याचीही माहिती या प्लॅटफॉर्म द्वारे देण्याची शक्यता आहे.
एकावेळी नोंदणी करून विविध शासकीय संकेतस्थळावर तुम्हाला मुशाफिरी करता येणार आहे. देशातील इतर राज्यांचे संकेतस्थळ, तुमच्या राज्याचे संकेतस्थळ, केंद्रातील विविध कार्यालयांच्या संकेतस्थळांवर तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या कामानुसार तुम्हाला एसेस देण्यात येईल. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया सुरक्षित असेल. त्यासाठी केंद्रीय एजन्सी कामाला लागल्या असून पुढील वर्षी ऑगस्ट 2022 पर्यंत हा महत्वकांक्षी प्रकल्प मूर्तरूप घेणार आहे.
बुधवारी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण खात्याने एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये केंद्राच्या अखत्यारीतील विविध मंत्रालयातील आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधींनीचे दीर्घकालीन बैठक सत्र घेण्यात आले. नागरिकांना एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवण्यासाठी काय काय उपाययोजना करते याविषयीची चर्चा या बैठकीत करण्यात आली.
National Digital Profile सरकार राष्ट्रीय डिजिटल प्रोफाइल तयार करत आहे एजन्सी यासाठी कार्यरत असून लवकरच हे प्रोफाईल प्रत्येक भारतीय नागरिकाला उपलब्ध असेल. यामार्फत नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. त्यासाठीचे अर्ज फाटे करता येतील.
आताच्या काळात रुपयात काय भेटतं हो? काय सांगता, दोन लाखांचा सरकारी विमा भेटतो की, कसा?
पुरुषांपेक्षा महिलांचा क्रेडिट स्कोअर का आहे चांगला; अहवालातून झाला मोठा खुलासा
BHSeries: वाहनांसाठी भारत सिरीज लागू; नव्या सिरीजसाठी ‘असा’ करा अर्ज