नवी दिल्ली- तुम्ही अद्यापही तुमचे आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक आहे का? (Aadhar card link to Pan) तुम्ही अद्यापही आधार कार्ड लिंक केले नसल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आधार कार्ड हे पॅन (Pan) कार्डला लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही 30 जून 2022 किंवा त्यापूर्वी आधार कार्ड हे पॅनला लिंक केल्यास तुम्हाला 500 रुपये दंडात्मक (Punitive) स्वरुपात द्यावे लागतील. जर तुम्ही 1 जुलैच्या नंतर पॅन लिंक करत असल्यास तुम्हाला 1000 रुपये दंडाचा भार निश्चितच सहन करावा लागेल. म्हणजेच, तुमच्याकडे आधार कार्ड हे पॅनला लिंक करण्यास अवघे सात दिवस शिल्लक आहेत.
आयकर कायद्यानुसार मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक न करणाऱ्यांस अतिरिक्त संधी निश्चितच मिळेल. मात्र, त्यासाठी त्यांना दंडाचा भार सहन करावा लागेल. एक एप्रिल ते 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड अदा करावा लागेल. 31 मार्च 2023 नंतर पॅन-आधार लिंकिंग साठी 1000 रुपयांचे दंडात्मक शुल्क द्यावे लागेल. दंडात्मक शुल्क भरल्यानंतर लिंकिंग शक्य ठरणार आहे.
तुमचे आधार कार्ड हे पॅन सोबत लिंक नसल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पॅन निष्क्रिय ठरल्यास तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करू शकणार नाही. बँकेत खाते उघडणं शक्य ठरणार नाही.
· तुम्हाला सर्वप्रथम आयकर विभागाची अधिकृत वेबसाईट http://www.incometax.gov.in वर लॉग-इन करणं अनिवार्य असेल.
· क्विक लिंक्स सेक्शन मधून Link Aadhaar (आधारला लिंक करा) पर्याय निवडा.तुमच्यासमोर नवीन विंडो उघडली जाईल.
· तुम्ही आता तुमचे पॅन, आधार तपशील तसेच नाव व मोबाईल नंबर एन्टर करा
· ‘I validate my Aadhaar details’ (मी माझे आधार तपशील प्रमाणित करत आहे) पर्याय निवडा आणि ‘Continue’ (पुढे सुरू ठेवा) पर्याय निवडा.
· तुमच्या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.
· ओटीपी एन्टर करण्याद्वारे ‘Validate’ (प्रमाणित करा) वर क्लिक करा.
· तुम्हाला विशिष्ट दंडाची रक्कम भरल्यानंतर आधार हे पॅन सोबत लिंक केले जाईल.