नवी दिल्ली: देशातील आघाडीची फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोची प्रारंभिक खुली भागविक्री (IPO) बुधवारपासून सुरु होणार आहे. या IPO ला शेअर बाजारात चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 13 ते 16 जून या काळात IPOचे सबस्क्रिप्शन सुरु राहील. या आयपीओसाठी समभागाचे मूल्य 72 ते 76 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून 9375 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट झोमॅटोने ठेवले आहे.
झोमॅटो ही आजघडीला भारतात फूड डिलिव्हरी करणारी प्रमुख कंपनी आहे. या कंपनीचा कारभार 23 देशांमध्ये विस्तारला आहे.
हा शेअर बाजारातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा आयपीओ ठरेल, असा अंदाज आहे. यापूर्वी SBI कार्डस अँण्ड पेमेंट सर्व्हिसेजच्या IPO च्या माध्यमातून 10,341 कोटींची भांडवल उभारणी करण्यात आली होती. तत्पूर्वी आयआरटीसीचा आयपीओही चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.
Zomato च्या लॉटबाबत बोलायेच झाले तर सामान्य गुंतवणुकदार 195 शेअर्सचा लॉट आणि याच पटीत शेअर्स खरेदी करु शकतात. सामान्य गुंतवणुकदार जास्तीत जास्त 13 लॉट विकत घेऊ शकतात. याचा अर्थ एक व्यक्ती जास्तीत जास्त 1.94 लाख रुपयांची गुंतवणूक करु शकते. तर 65 लाख शेअर्स हे Zomato च्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
देशातील सर्वात मोठ्या सरकारी संस्थांपैकी असणारी जीवन विमा निगम अर्थात LICच्या खासगीकरणाच्या हालचालींना आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. कारण, केंद्रीय मंत्रिमंडळाने एलआयसीच्या प्रारंभिक खुल्या भागविक्रीला (IPO) मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन इकोनॉमिक अफेअर्सकडून (CCEA) या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत LIC चा आयपीओ बाजारपेठेत येऊ शकतो. LIC चा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.
LICच्या आयपीओचा 10 टक्के हिस्सा हा पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला जाईल. हा आयपीओ बाजारपेठेत आल्यानंतरही एलआयसीमधील सर्वाधिक भागीदारी ही केंद्र सरकारकडेच असेल. मात्र, हा आयपीओ बाजारपेठेत आणण्यापूर्वी केंद्र सरकारला कायद्यात काही सुधारण करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने यंदाच्या वर्षात सरकारी बँका आणि संस्थांच्या खासगीकरणाच्या माध्यमातून 1,75,000 कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
संबंधित बातम्या:
एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली; याच महिन्यात मर्चंट बॅंकर्सकडून मागवणार निविदा
LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे
मोदी सरकार LIC बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ग्राहकांवर काय परिणाम होणार?