Raosaheb Danve on Coal | राज्यांना कोळसा पुरवण्यासाठी केंद्रानं 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या

Raosaheb Danve on Coal | राज्यांना कोळसा पुरवण्यासाठी केंद्रानं 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या

| Updated on: May 07, 2022 | 7:56 PM

केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द करून, त्या केवळ कोळसा पुरवठ्यावर लावले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांनी दिली.

परभणीः केंद्र सरकारची जबाबदारी ही राज्यांना कोळसा पुरवायची आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने 1 हजार पॅसेंजर ट्रेन रद्द (passenger trains) करून, त्या केवळ कोळसा पुरवठ्यावर (coal supply) लावले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिले आहे. यावेळी ब्राह्मण मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी वक्तव्याविषयी विचारले असता, त्यांनी हा मुद्दा माध्यमांवरच ढकलून दिला, व सांगितले की, मुख्यमंत्री पद कोणासाठीही राखीव नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते परभणीमध्ये कृषी महोत्सवानिमित्त आले असता, पत्रकारांशी बोलत होते. परभणी येथे कृषी संजीवनी महोत्सव सुरू असून, तीन दिवसीय कार्यक्रमांच्या, दुसऱ्या दिवशी रावसाहेब दानवे यांनी जेव्हा या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कोळसा या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी कृषी प्रदर्शनातील स्टॉलला भेटी घेत ,माहिती त्यांनी घेतली.

Published on: May 07, 2022 07:56 PM