शिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स

शिंदे गटासह उद्धव ठाकरें कडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; पहा यासह 10 च्या 10 हेडलाईन्स

| Updated on: Oct 04, 2022 | 10:27 PM

दसरा मेळाव्याला राज्याच्या काणाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

शिंदे गटासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज्याच्या काणाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांचीही तोफ धडाडण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांना जाण्यासाठी 1800 बसेसची सोय करण्यात आली आहे. तसेच बीकेसीवर मोठमोठ्या एलईडी लावण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील कोणाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असताना कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे आवाहन पोलीसांच्या समोर आहे. यासाठी तब्बल 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

 

Published on: Oct 04, 2022 10:27 PM