ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर धर्मसंकट ! 116 कुटुंबियांनाच कसली नोटीस?
मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनसह त्याच्या शालेय साहित्य खरेदीसाठी सध्या पालकांची धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र डीबी मार्ग पोलीस वसाहतीत वेगळ्याचं कारणामुळं पळापळ सुरू आहे.
मुंबई : जुन महिना सुरू झाला आहे. आता शाळा आणि पावसाळा देखील सुरू होईल. त्यामुळं मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनसह त्याच्या शालेय साहित्य खरेदीसाठी सध्या पालकांची धावपळ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र डीबी मार्ग पोलीस वसाहतीत वेगळ्याचं कारणामुळं पळापळ सुरू आहे. येते पोलीस वसाहतीत राहणाऱ्या 116 कुटुंबियांना तातडीनं घरं खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळं अनेकांना हा धक्का बसला आहे. कारण पावसाळ्याच्या तोंडावर या पोलीसांना डीबी मार्ग ऐवजी माहिम, नायगाव, वरळी इ. ठिकाणी पर्यायी घरं देण्यात आली आहेत. जी डीबी मार्ग येथील घरांपेक्षा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत, असा दावा पोलीसांच्या कुटुंबियांनी केला आहे. तर स्ट्रक्चरल ॲाडिटमघ्ये इमारत धोकादायक असल्याचं कारण या पाठवलेल्या नोटिसमध्ये देण्यात आलं आहे. तर आता मुलांच्या शाळा सुरु होण्यास अवघे काही दिवस असताना घरं कसं बदलायचं? असा प्रश्न मुंबई पोलीसांसमोर उभा राहिला आहे.