कोकण रेल्वे मार्गावरील मोठी अपडेट; 12 स्थानकांचा लवकरच होणार कायपालट
कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वेवरील 12 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.
रत्नागिरी, 8 ऑगस्ट 2023 | कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण कोकण रेल्वेवरील 12 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे.या रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे भूमीपूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा भूमीपूजन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन भूमीपूजन होणार आहे. कोकण रेल्वेची स्थानके क्राँक्रीटच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. रेल्वे स्थानक कशी दिसणार याची झलक सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या नव्या लुकचा थ्रीडी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Published on: Aug 08, 2023 09:45 AM
Latest Videos