Special Report | भीषण अपघात,कठडे तोडून बस नदीत; नर्मदा नदीत 13 जणांना जलसमाधी
इंदोर अमळनेर ही अमळनेर आगाराची बस सकाळी साडे सात वाजता इंदोरहून निघाली. दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी दरम्यान नर्मदा नदीच्या पुलावर सदर बसला अपघात झाला.
जळगाव : मध्य प्रदेशातील इंदोरकडून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेरकडे येणाऱ्या बसला (MP Bus Accident) आज सकाळी भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातील धार येथे उंच पुलावरून ही बस नदीत कोसळली. यात जवळपास 12 प्रवाशांचा करुण अंत झाल्याची माहिती आहे. या प्रवाशांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) एका नागरिकाचाही समावेश होता. पैठण (Paithan) तालुक्यातील जगन्नाथ जोशी हे या बसमध्ये होते. या दुर्दैवी घटनेत जगन्नाथ जोशी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे वृत्त कळाल्यावर जोशी कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पैठण तालुक्यातील पाचोड गावावर सध्या शोककळा पसरली आहे.
Published on: Jul 18, 2022 10:38 PM
Latest Videos