Cocaine Seized : मुंबई विमानतळावरून जप्त केलं 13 कोटींचं 1300 ग्राम कोकेन, एकाला अटक

Cocaine Seized : मुंबई विमानतळावरून जप्त केलं 13 कोटींचं 1300 ग्राम कोकेन, एकाला अटक

| Updated on: Sep 03, 2022 | 4:43 PM

एकूण 87 कोकेनच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर (Mumbai airport) ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई विमानतळावरून 10 कोटी रुपयांपेक्षाही जास्त किंमतीचे अंमली पदार्थ (Narcotics) जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांची किंमत तब्बल 13 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यात प्रामुख्याने कोकेनचा समावेश आहे. एकूण 87 कोकेनच्या कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर (Mumbai airport) ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर मुंबई विमानतळावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवात करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळलेल्या अंमली पदार्थांमुळे अनेक शंका आता व्यक्त केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपासही केला जातोय. 28 ऑगस्टला कस्टम विभागाच्या (Customs Department) काही अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला अटक केली होती. त्या व्यक्तीला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या  पोटातून तब्बल 87 कोकेनच्या कॅप्सूल बाहेर पडल्या होत्या. तीन दिवसात या कोकेनच्या कॅप्सून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने खाल्या होत्या, असे नंतर समोर आले होते.

Published on: Sep 03, 2022 04:43 PM