पुण्यात पाच महिन्यांत 163 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, ओळखीच्या व्यक्तींकडूनच गुन्ह्यांचे प्रमाण अधिक
19 प्रकरणातील पिडीता या दहा वर्षांखालील आहेत तर अत्याचाराच्या गुन्ह्यातील पिडीता या 12 ते 16 वयोगटातील आहेत असेही पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त ( गुन्हे शाखा ) शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात मागील साधारण तीन महिन्यात 20 ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनूसार एकूण बलात्काराचे गुन्हे एकूण 163 गुन्हे ( पोक्सो कायद्यांतर्गत ips सह ) आणि विनयभंगाचे 185 गुन्हे दाखल झालेले आहेत. बलात्कार प्रकरणातील गुन्हे हे 100 टक्के पीडीतेच्या ओळखीच्या व्यक्तींनी केलेले आहेत. तर विनयभंगाचे 93 टक्के घटना देखील जवळचे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तीने केलेल्या आहेत. आम्ही अशा प्रकरणात ‘पोलिस काका’, ‘पोलिस दिदी’, ‘गुड टच, बॅड टच’, ‘तक्रार पेटी’ सुरु केलेल्या आहेत. तसेच शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले आहेत. पोक्सो अॅक्टप्रमाणे शिक्षकांवर देखील जबाबदारी आहे. अशी घटना कळताच पोलिसांना कळविण्याची जबाबदारी पोक्सो कायद्यांर्गत शिक्षकांवर देखील आहे.शाळेत मोठा वेळ मुलांचा जात असतो. अशा प्रकारच्या घटना शिक्षकांनी कळविले पाहीजे. त्यामुळे आम्ही शिक्षकांना देखील याचे प्रशिक्षण दिलेले आहे. आम्ही या गुन्ह्यातील पीडीतांना धक्क्यातून बाहेर येण्यासाठी सायकॉलॉजिक मदत देखील करीत असतो असे अतिरिक्त आयुक्त ( गुन्हे शाखा ) शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.