अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीची एक्सलुसिव्ह दृश्य जारी, एका मिनिटात किती भाविक घेणार दर्शन?
अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिराच्या तीनशे छोट्या मूर्ती तयार करण्याचे काम शिल्लक आहे. त्या पंधरा दिवसात तयार केल्या जातील. तीन मजली भव्य असे राममंदिर भूकंपापासून देखील सुरक्षीत आहे. मुख्य गर्भगृहात सुवर्ण काम करण्यात येत आहे. वेस्ट परकोटा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.
अयोध्या | 27 डिसेंबर 2023 : अयोध्येतील स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमूना असलेल्या भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्याची उत्सुकता जगभरातील भारतीयांना लागली आहे. यातच आता राममंदिराच्या उभारणीची एक्सलुसिव्ह दृश्य टीव्ही 9 मराठीवर पहिल्यांदाच दाखविण्यात येत आहेत. या सोहळ्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आदी मान्यवर आहेत. या मंदिराच्या उभारणीसाठी कृत्रिम दगडांचा पाया तयार करण्यात आला आहे. तीनशे मूर्ती पंधरा दिवसात तयार होणार आहेत. या मुख्य आठ इंजिनिअर पैकी सहा जण मराठी आहेत. या मंदिराचे बांधकाम लार्सन एण्ड टुब्रो कंपनीमार्फत सुरु आहे. हे मंदिर तीन मजल्याचे आहे. भाविकांसाठी चार लाईन असणार असून एका मिनिटांत 178 भाविक दर्शन घेऊन शकतात अशी व्यवस्था असल्याचे अभियंते संतोष गोरे यांनी म्हटले आहे. सामान्य भाविकांना राम मंदिराचे दर्शन फेब्रुवारीपासून मिळणार आहे. 30 डिसेंबर अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन होणार असून टर्मिनल इमारतीला राम मंदिराच्या प्रतिकृतीचे रुप देण्यात आले आहे.