युक्रेनमधून भारतात परतलेले 18 हजार विद्यार्थी संकटात, ऑनलाईन शिक्षण बंद

युक्रेनमधून भारतात परतलेले 18 हजार विद्यार्थी संकटात, ऑनलाईन शिक्षण बंद

| Updated on: May 13, 2022 | 9:47 AM

युक्रेनमधून भारतात परतलेले विद्यार्थी फी भरू शकत नसल्याने त्यांचे ऑनलाईन क्लास बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी मोठ्या संकटात सापडले आहेत.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले हजारो भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मात्र आता या विद्यार्थ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. या विद्यार्थ्यांना बँकांकडून स्वीफ्ट कोड मिळत नसल्याने शुल्क भरण्यात अडचण येत आहे. जे विद्यार्थी शुल्क भरू शकले नाहीत त्यांचे ऑनलाईन क्लास बंद करण्यात आले आहेत.  ऑनलाईन क्लास बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे.

Published on: May 13, 2022 09:47 AM