VIDEO | 2000 rupee notes : आजपासून डेटलाईन सुरू? 30 सप्टेंबर शेवटची डेट, एका वेळी किती बदलून मिळणार नोटा?
RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. तर 23 मे म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलता येणार आहेत.
मुंबई : 2016 नंतर आता 19 मे 2023 हा दिवस ही देशासाठी ऐतिहासिक ठरला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देशात पुन्हा एकदा नोटबंदी (Demonetisation) जाहीर करण्यात आली. केवल 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Notes) चलनातून मागे घेण्यात आल्या आहेत. RBI ने लोकांना 2000 च्या नोटा बदलण्यासाठी तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. तर 23 मे म्हणजेच, आजपासून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बदलता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. 20,000 रुपयांपर्यंतच्या 2000 च्या नोटा बँकांमध्ये एकाच वेळी सहज बदलता येतील. त्याचबरोबर बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. मात्र यासाठी बँकेच्या ठेवींचे नियम पाळावे लागणार आहे. तर या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही, तसेच ओळखपत्राचीही गरज नाही. एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलू शकता.