भाजपच्या तालुका अध्यक्षाचे भास्कर जाधव यांना इशारा, यासह पहा इतर बातम्या 25 महत्वाच्या बातम्या
भाजपचे कनकवली तालूक्याचे भाजप अध्यक्ष संतोष कानडे यांनी भास्कर जाधव यांना इशारा दिला आहे. तसेच भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गात पाय ठेवल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण भाजपमध्ये असलो तरिही राणे स्टाईल विसरलो नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी घराच्या बाहेर लाठ्या-काठ्या आणि दगड, स्टंप आणि बाटल्या आढळून आल्या. याबाबत सध्या पोलिस तपास करत आहेत. तर या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याने केला आहे. तर भास्कर जाधव असोत की आणि अन्य कोणी शिवसैनिक त्यांच्यावर हल्ला केल्यास जशाच तसे उत्तर दिलं जाईल असा स्पष्ट इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. त्याचदरम्यान भाजपचे कनकवली तालूक्याचे भाजप अध्यक्ष संतोष कानडे यांनी भास्कर जाधव यांना इशारा दिला आहे. तसेच भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गात पाय ठेवल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण भाजपमध्ये असलो तरिही राणे स्टाईल विसरलो नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईत ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे.