परतीचा पाऊस, शिंदे गटात कोणाचा प्रवेश? चंद्रकांत पाटील काय म्हणाले? यासह पहा नव्या बातम्या नवे अपडेट 25 महत्वाच्या बातम्यामध्ये
पुण्यात परतीच्या पावसामुळे बोजारा उडाला आहे. यावरून सामनामधून खरमरीत टीका करण्यात आली आहे. यावेळी सामनामधून पुण्यात राहतोय की पाण्यात अशी टीका करण्यात आली आहे.
राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या गटात इतर राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. आताही त्यांच्या गटात शिव प्रहार संघनेचे अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर प्रवेश केला आहे. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला यावेळी पाटील यांची शिंदे गटाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्यात परतीच्या पावसामुळे बोजारा उडाला आहे. यावरून सामनामधून खरमरीत टीका करण्यात आली आहे. यावेळी सामनामधून पुण्यात राहतोय की पाण्यात अशी टीका करण्यात आली आहे. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या टीकेला उत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पाटील यांनी, तुम्ही 20 वर्ष मुंबईत राहत आहात? तुम्ही काय केला? मुंबईची जबाबदारी झटकली अशी टीका केली आहे.