राज्यात परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान, पहा कुठे काय आहे स्थिती 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं आहे.
परतिच्या पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी हैदोस घातला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात मुकसान झाले आहे. असेच नुकसान वाशिम जिल्ह्यात पहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबिन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कापून ठेवलेल्या सोयाबिनला कोंब फुटले आहेत. दरम्यान सोलापुरमध्येही ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच सोयबिन वाहुन गेलं आहे. तर पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं आहे. तसेच सोलापूरसह ग्रामिण भागात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंदापूरमधील उजणी धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण आला असून एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र अंधारातच होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांना अद्यापही पगार मिळालेला नाही. त्यामुळे पगार न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.