कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले, यासह पहा इतर अपडेट 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
पालघरमधील विक्रमगडच्या मसा गावच्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून शाळेसाठी प्रवास करावा लागत आहे. येथील मुलांना नदीवर पूल नसल्याने टायरट्यूबवर बसून नदी पार करावी लागत आहे. तर अनेकवेळा याबाबत तक्रार करूनही पुढारी यावर लक्ष देत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी मांडली आहे.
आजही मुलांना शिक्षणासाठी कुठे चिखल तर कुठे पाण्यातून वाट काढावी लागत आहे. शिक्षण मिळावे यासाठी मिळेल त्या साधनाने शिक्षणाची पाय वाट तुडवावी लागत आहे. असेच चित्र पालघरमधील विक्रमगडच्या मसा गावच्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून शाळेसाठी प्रवास करावा लागत आहे. येथील मुलांना नदीवर पूल नसल्याने टायरट्यूबवर बसून नदी पार करावी लागत आहे. तर अनेकवेळा याबाबत तक्रार करूनही पुढारी यावर लक्ष देत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी मांडली आहे. तर साताऱ्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे कोयना धरण क्षेत्रात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. यामुळे धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत. दरम्यान परतीच्या पावसाचा फटका कोल्हापूरमधील इचलकरंजीला बसला आहे. येथे परतीच्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुसकान झाले आहे. ऊस, शेंगा, हरभरा आणि सोयाबिनचे नुकसान झालं आहे. पुण्याच्या शिवाजी नगर आणि स्वारगेट डेपोच्या बाहेर एसटी बससच्या रांगा पहायला मिळत आहेत. येथे इंधन नसल्यामुळे अशा रांगा लांबच्या लांब लागल्या. तर इंधन नसल्याने लाखो रूपयांचे नुकसान होत असून वाहतुकही विस्कळीत झाली आहे.