सोलापूरमधील करमाळ्यात ढगफूटीसदृष्य पाऊस, यासह पहा 36 जिल्हे 72 बातम्या
जळगावमध्ये देखिल पावसामुळे केळी बागेचे नुकसान झालं आहे. यावेळी नुकसान भरपाई मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला.
राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि मदत करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर राज्यात पडलेल्या पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहिर करा या मागणीसाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याचबरोबर पवार यांनी कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध करावा अशीही मागणी शिंदे यांच्याकडे केली आहे. दरम्यान जळगावमध्ये देखिल पावसामुळे केळी बागेचे नुकसान झालं आहे. यावेळी नुकसान भरपाई मिळाली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. याचवेळी सोलापूरमधील करमाळा तालुक्यात ढगफूटीसदृष्य पाऊस झाला. यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर सांगलीमध्ये महापालिकेच्या सभेत महापौर आणि नगरसेवक यांच्यात राडा पहायला मिळाला. मिरजमधील ड्रेनेज कामावरून नगरसेवक आणि महापौर यांच्यात राडा पहायला मिळाला.