नुसकसान भरपाई, अरोग्य विभागात मेगा भरतीसह दिवाळी कीटबाबत पहा बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये

नुसकसान भरपाई, अरोग्य विभागात मेगा भरतीसह दिवाळी कीटबाबत पहा बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये

| Updated on: Oct 21, 2022 | 7:08 PM

नांदेडमध्ये मागिल 4 महिन्यात 69 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नांदेडमध्ये पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या आत्महत्या केल्या आहेत.

राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य शासनाकडून शासकीय भरत्या सुरू झाल्या आहेत. तर राज्यातील अरोग्य विभागात मेगा भरतीची घोषणा झाली आहे. यातंर्गत 1 ते 7 जानेवारीमध्ये अर्ज प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. तर परिक्षा 25 आणि 26 मार्चला होणार आहे. तर औरंगाबादमध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुसकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा केली आहे. तसेच ही मदत त्यांना येत्या 15 दिवसांत देण्यात येईल. तसेच सुट्टीच्या दिवशीही बँक कर्मचारी कामावर येतील असेही आश्वासन सत्तार यांनी दिलं आहे. तर राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असतानाच अनेक जिल्ह्यांना त्यांचा फटका बसत आहे. नांदेडमध्येही मुसळधार पाऊस फडल्याने पूर आला आहे. तर पूर आल्याने नांदेडमधील अनेक गावांचा संपर्क तुलटा आहे. तर नांदेडमध्ये मागिल 4 महिन्यात 69 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नांदेडमध्ये पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या आत्महत्या केल्या आहेत. मशिनमध्ये खराबी आल्याने दिवाळी कीट वाटपात अडचणी येत आहेत. नाशिकच्या मनमाड आणि नागपूरमध्ये या अडचणी येत असल्याने अनेक नागरिकांना शिधासाठी ताटकळत दुकानाबाहेर थांबावे लागत आहे.

 

Published on: Oct 21, 2022 07:08 PM