दिवाळी, दिवाळी खरेदी काय आहे राज्यात स्थिती पहा नव्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यामध्ये
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिधा दिवाळी कीटवरून शिंदे सरकारला सल्ला दिला आहे. तसेच शिधा पाकीटाचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तर हा काळाबाजार थांबला पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे.
दिवाळी आली असून नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. अशीच गर्दी औरंगाबादच्या पैठणा बाजार गेट परिसरात पहायला मिळाली. तर बाजारात तुफान गर्दी पहायला मुळत आहे. तर नागपूरमधीलही सीताबर्डी मार्केटमध्ये काही वेगळे चित्र नाही. येथे देखिल मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कपडे आणि सजावटीच्या साहित्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिधा दिवाळी कीटवरून शिंदे सरकारला सल्ला दिला आहे. तसेच शिधा पाकीटाचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. तर हा काळाबाजार थांबला पाहिजे असेही त्यांनी म्हटलं आहे. तर दिवाळी आणि खरेदी याचं नातं वेगळेच आहे. जळगावमध्ये धनत्रयोदशीनिमित्त सुवर्ण नगरीत सोनं खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं आहे. यावेळी आमदार लंके यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.