पहा आपला जिल्हा आपल्या बातम्या 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिंदे गटातील आमदारांना आणि नेत्यांना मोठा सल्ला दिला आहे. तसेच आमदारांनी आणि नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघातच दिवाळी साजरी करा. मतदारसंघात जनसंपर्क वाढवा असेही शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले आहे. त्यावर आता झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. याचदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी दोन पावले पुढे येण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहतं कसानग्रस्त शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिंदे गटातील आमदारांना आणि नेत्यांना मोठा सल्ला दिला आहे. तसेच आमदारांनी आणि नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघातच दिवाळी साजरी करा. मतदारसंघात जनसंपर्क वाढवा असेही शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दिवाळी कीटवरून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदेंवर टीका केली आहे. त्यांनी कीटवर फोटो नसल्यानेच वितरण होत नसल्याचे म्हटलं आहे.