36 जिल्हे 50 बातम्या | 36 Jillhe 50 News | 8.30 AM | 3 October 2022 -TV9
पु्ण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आली. पुण्यात 4 रूपयांनी सीएनजी महाग झाला आहे. त्यामुळे 87 रूपये किलो मिळणारा सीएनजी आता 91 रूपये झाला आहे.
मुंबईत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागल्यानंतर आता पुण्यात देखिल सर्वसामान्यांना हमागाईची झळ बसली आहे. पु्ण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आली. पुण्यात 4 रूपयांनी सीएनजी महाग झाला आहे. त्यामुळे 87 रूपये किलो मिळणारा सीएनजी आता 91 रूपये झाला आहे. तर आतंरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाला मागणी कमी झाली आहे. त्याचा परिणाम तेलाच्या दरावर झाला असून दरात घसरण झाली आहे. सुर्यफूल आणि पामतेलाच्या किंमतीत 40 ते 50 रूपये घट झाली आहे. तर एसटी महामंडळाकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे महामंडळाकडून 4 वर्षात किमान 7000 गाड्यात वाढविण्यात येणार आहेत. तसेच महामंडळाकून नोकर भरती ही पुढील 5 वर्षे करण्यात येणार नाही. दरम्यान 11 वीच्या ऑनलाईन प्रवेशाला अपेक्षित प्रवेश न झाल्याने 15 ऑक्टोंबरपर्यंत प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
Published on: Oct 03, 2022 10:04 AM
Latest Videos