वादंग सुरू असताना अजित पवार यांचे स्पष्टीकरण तर शिंदे यांची टीका, पहा काय सुरू आहे राज्यात, 4 मिनिट 24 हेडलाईन्स

वादंग सुरू असताना अजित पवार यांचे स्पष्टीकरण तर शिंदे यांची टीका, पहा काय सुरू आहे राज्यात, 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Jan 04, 2023 | 9:53 PM

राज्यात अनेक ठिकाणी वाद आणि आंदोलने झाल्यानंतर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. तर त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. पहा हेडलाईन्स

मुंबई : राष्ट्रावादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला. त्यांच्या छातीला मार लागला आहे. तर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेण्यात येणार आहे.

तसेच भारतीय क्रिक्रेटर ऋषभ पंत देखिल उपचारासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याच्यावर लिगामेंटची शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. तर आपण काही चुकीचं बोललो नसल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

तर राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीत एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट पडल्याचे म्हटलं आहे.

Published on: Jan 04, 2023 09:53 PM