राज ठाकरे यांच्या पत्रावर भाजपचा निर्णय का? जनतेचा सवाल...

राज ठाकरे यांच्या पत्रावर भाजपचा निर्णय का? जनतेचा सवाल…

| Updated on: Oct 17, 2022 | 5:29 PM

अंधेरी पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राग दिसून आला. तसेच राज ठाकरे यांच्या पत्रावर भाजपचा निर्णय का? जनतेला निर्णय घेऊ द्या असे म्हणत, मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांची भाजपसह ठाकरेविरोधात घोषणाबाजी.

राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने आपली माघार घेतली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे घोषणा यांनी केली. तर आपण अपक्ष लढणार नाही. पक्षाचा आदेश पाळणार असे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे वक्तव्य माघारीनंतर केलं आहे. तर भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पावले उचलल्याबद्दल तर इतरांना आवाहन केल्याबाबत आपण ठाकरे, पवार आणि सरनाईक यांचे आभारी असल्याचे लटके यांनी म्हटलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राग दिसून आला. तसेच राज ठाकरे यांच्या पत्रावर भाजपचा निर्णय का? जनतेला निर्णय घेऊ द्या असे म्हणत, मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांची भाजपसह ठाकरेविरोधात घोषणाबाजी.

 

Published on: Oct 17, 2022 05:29 PM