पटेलांवर सहा वर्ष निवडणूक न लढविण्याचा निर्णय झाला असताना, उमेदवारी कशी दिली? ठाकरे गटाचा आक्षेप
आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेवर टीका केली आहे. तसेच पुढचा खासदार निवडणूक येण्यापर्यंत राणे भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे. तसेच आमच्याबद्दल वाईट बोलणे हेच त्यांच काम असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर स्वतंत्र चर्चा झाली. ठाकरे आणि शिंदे यांच्यात राज्यातील सध्य राजकीय घडामोडींसह अंधेरी पोटनिवडणुकीवर चर्चा झाली. तर आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेवर टीका केली आहे. तसेच पुढचा खासदार निवडणूक येण्यापर्यंत राणे भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे. तसेच आमच्याबद्दल वाईट बोलणे हेच त्यांच काम असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारी विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाणार आहे. तसेच पटेलांवर सहा वर्ष निवडणूक न लढविण्याचा निर्णय झाला असताना. उमेदवारी कशी दिली असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा राजकीय गेम केला असे गायकवाड म्हणाले. तर बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरे यांनी कार्याध्यक्ष होण्यासाठी खेळी केल्याचे ते म्हणाले.