शिवसेना नेत्या शिंदेंच्या भेटीला, पहा कोण गेलं? 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

शिवसेना नेत्या शिंदेंच्या भेटीला, पहा कोण गेलं? 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 22, 2022 | 7:44 PM

उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सय्यद यांनी, ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा याआधीचा दौरा करायला हवा होता, असे म्हटलं आहे.

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून ते तेथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद ही साधणार आहेत. तर ठाकरे काय बोलणार? कोणती मागणी करणार? याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागले आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सय्यद यांनी, ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा याआधीचा दौरा करायला हवा होता, असे म्हटलं आहे. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच हे सरकार फक्त घोषणा करतं असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. तसेच राज्यात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी वर्षावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्या शिंदे गटात प्रवेश करतील अशा चर्चांना उत आला आहे. मात्र ही दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट होती असा खुलासा सय्यद यांनी केला आहे.

Published on: Oct 22, 2022 07:44 PM