‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला मिळणार राज्यगीताचा दर्जा, यासह पहा राज्यातील नव्या अपडेट 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
शिवसनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे पुढचे टार्गेट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचेही आरोप पवार यांनी केला आहे.
‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला आता राज्यगीताचा दर्जा मिळणार आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे. तर अंधेरी पोट निवडणूकीत भाजपची भूमिका ही मनस्ताप देणारी होती अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांनी अंधेरी पोट निवडणूकीत भाजपने पळ काढला असे देखिल खोचक टीका भाजपवर केली आहे. याचदरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र भाजपचे कौतूक केलं आहे. अजित पवार यांनी, भाजपने माघार घेतली ही चांगलं झालं असं म्हटलं आहे. तसेच शिवसनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपचे पुढचे टार्गेट असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचेही आरोप पवार यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत पवार-ठाकरे- गांधी एकत्र येत राज्यातील महाविकास आघाडी ही भक्कम असल्याचा संदेश देणार असल्याचेही कळत आहे. यादरम्यान संजय राऊत यांना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकावर साध्या वेशातील पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळत आहे. राऊतांना भेटणाऱ्या प्रत्येकाची नोंद पोलीस ठेवत आहेत.