कोकणात राणे-जाधव आमोरा-समोर, पहा काय घडतंय कोकणात, 4 मिनिटं 24 हेडलाईन्समध्ये
खालच्या पातळीवर जात टीका केली तर कार्यकर्ते उत्तर देणारच असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. तर निलेश राणेंच्या उत्तरावर पलटवार करताना जाधव यांनी राणेंकडून आम्हाला संस्कृती शिकण्याची गरज नाही असे म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी घराच्या बाहेर लाठ्या-काठ्या आणि दगड पडलेली पहायला मिळाली. यानंतर भास्कर जाधव यांनी या हल्लावर आपली प्रतिक्रिया दिली. मी हल्ल्याला घाबरणारा नाही. जर आमच्यावर हल्ला करून तुमचा पक्ष वाढणार असेल तर मारा असा पलटवार जाधव यांनी हल्ले खोरांवर केला आहे. तर सुरक्षा व्यवस्था काढल्यावरूनही भास्कर जाधव यांनी गृहमंत्रालयावर टीका केली आहे. तसेच गृहमंत्रालयाकडून सुरक्षा व्यवस्था काढण्याचे आदेश आले असतील असं म्हणत जाधव यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यादरम्यान खालच्या पातळीवर जात टीका केली तर कार्यकर्ते उत्तर देणारच असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. तर निलेश राणेंच्या उत्तरावर पलटवार करताना जाधव यांनी राणेंकडून आम्हाला संस्कृती शिकण्याची गरज नाही असे म्हटलं आहे. दरम्यान कुडाळमध्ये भाजपच्या मागणीनंतर भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत जहरी टीका केली होती.