माझं संरक्षण फडणवीसांनी काढलं! असं का म्हणाले जाधव? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

माझं संरक्षण फडणवीसांनी काढलं! असं का म्हणाले जाधव? पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 19, 2022 | 6:02 PM

मंत्रीमंडळ विस्तारावरून आणि नाराज असलेल्या आमदारांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली आहे. यावेळी खडसे यांनी मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असा टोला लगावला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार हे नाराज असल्याचे सुत्रांकडून माहिती मिळत आहे. याचदरम्यान नाराज आमदारांची नाराजी दुर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत. जे आमदार नाराज आहेत. त्यांची वर्णी महामंडळांवर केली जाणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारावरून आणि नाराज असलेल्या आमदारांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली आहे. यावेळी खडसे यांनी मंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असा टोला लगावला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी संरक्षण काढल्यावरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी माझं संरक्षण फडणवीसांनी काढलं असावं असे ते म्हणाले. तर राज्यातील राजकारण हे खालच्या पातळीवर गेले आहे. तसेच भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्लाचा तपास व्हावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

 

Published on: Oct 19, 2022 06:02 PM