गद्दारांना गाडून ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला : उद्धव ठाकरे यांच्या या बातमीसह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
भास्कर जाधव यांनी किरीट सोमय्यांसह राणे पिता-पुत्रावर टीका केली आहे. तसेच बेडूक, कोंबडीवाल्यांच्या भ्रष्टाचारावर आता सौमय्या गप्प का असा हल्ला जाधव यांनी केला आहे.
राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. यावेळी भाजप नंबर वन तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला देखिल चांगले यश मिळाले. या यशावर बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. यावेळी ठाकरे यांनी गद्दारांना गाडून ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला असे म्हणत राजन साळवी यांचे कौतूक केलं आहे. तर बुलढाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटासह विविध पक्षांना धक्का देत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. यावेळी त्यांच्याशी बोलताना, आपण लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर भास्कर जाधव यांनी किरीट सोमय्यांसह राणे पिता-पुत्रावर टीका केली आहे. तसेच बेडूक, कोंबडीवाल्यांच्या भ्रष्टाचारावर आता सौमय्या गप्प का असा हल्ला जाधव यांनी केला आहे. तर सगळं ओके आहे आपण लवकरच बाहेर येणार असल्याचं संजय राऊत म्हणाल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. एकनाथ खडसे आणि राऊत यांची कोर्टात भेट झाली. त्यावेळी त्यांच्यात हे बोलणं झालं. या दरम्यान आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर एन्जीओग्रीफी करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी रूग्णालयात जात भेट घेणार असल्याचे कळत आहे.