उद्धव ठाकरेंवर कोणी केली टीका? काय म्हणाले राणे पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहता सरसकट ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच दौऱ्यावर निघाले आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तर यावेळी उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी शासनाकडे कोणती मागणी करणार आणि ते काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान पाहता सरसकट ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी शिंदे आणि भाजपवर घणाघात केला आहे. खैरे यांनी, आमदारांना खोके दिले. आता नुकसानग्रस्तांना पेट्यातरी द्या असे म्हटलं आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे याचं राजकारण हे फक्त मातोश्री पुरतं मर्यादित आहे. आता त्यांच्याकडे उरलेले आमदार देखिल आमच्याकडे येतील असा टोला ही ठाकरे यांना लगावला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात लवकरच मोठी भरती काढली जाईल असे म्हटलं आहे. फडणवीस यांनी पोलीस विभागात 18 हजार पदांची भरती काढणार असल्याचे जाहिर केलं आहे.