उद्धव ठाकरेंची भाजपसह शिंदे आणि राज यांच्यावर टीका, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

उद्धव ठाकरेंची भाजपसह शिंदे आणि राज यांच्यावर टीका, पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये

| Updated on: Oct 20, 2022 | 5:43 PM

अंधेरीत पराभव दिसल्यानंच माघार घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर कोणालातरी विनंती करवून माघार घेतली असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी लगावला आहे.

राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे विरूद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामाना पहायला मिळत आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यात एकमेकांवर टीका होताना दिसत असते. आता ही उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांनी सेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं आणि लढायची वेळ आल्यावर भाजपला पुढे केल्याची टीका ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यासह भाजप आणि राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. अंधेरीत पराभव दिसल्यानंच माघार घेतल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर कोणालातरी विनंती करवून माघार घेतली असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी लगावला आहे. तर शिक्षकांना न आवडे, तो विनोद तावडे अशा शब्दात भास्कर जाधव यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. ते आझाद मैदान येथे सुरू असणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनात सामिल झाले होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली.