शिंदे गट उमेदवार देणार नाही असा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे या अपडेटसह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

शिंदे गट उमेदवार देणार नाही असा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे या अपडेटसह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 08, 2022 | 5:52 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ज्या गटाचा दावा योग्य असेल त्यालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल असे ते म्हणाले

राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष अजूनही संपलेला नाही. तर खरी शिवसेना कोणाची यावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ज्या गटाचा दावा योग्य असेल त्यालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल असे ते म्हणाले. तर होऊ घातलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गट उमेदवार देणार नाही असा दावा उद्धव ठाकरे गटाने केला आहे. त्याचवेळी मागितलेल्या वेळेनुसार उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला 700 पानांचं उत्तर आज दिलं आहे. तर सोमवारी निवडणूक आयोगाची बैठक होणार असून त्याचवेळी धनुष्यबाण चिन्हावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Published on: Oct 08, 2022 05:52 PM